आधी कोरोनाला हरवणार मगच संसार थाटणार, पोलिसांची अशी ही कर्तव्यनिष्ठा

आधी कोरोनाला हरवणार मगच संसार थाटणार, पोलिसांची अशी ही कर्तव्यनिष्ठा

देशभरात अनेक पोलीस दिवस-रात्र प्रतिकूल परिस्थितीत ड्यूटी करीत आहेत

  • Share this:

इंदूर, 30 एप्रिल : भटजींनी शुभ मुहूर्त ठरवला, लग्नाची तयारी झाली, लग्नाच्या सभागृहाचं बुकिंगही झालं. लग्नापूर्वीची सर्व खरेदीही झाली. पण मुहूर्तावर वधू-वर पोहचूच शकले नाहीत. कारण शुभ मुहूर्तापेक्षा वर-वधू आपल्या कर्तव्याशी जास्त बांधलेले होते. कोरोनाच्या संकटात  कर्तव्यामुळे लग्नाची गाठ सध्या बांधायची नाही असं ठरवलंय मध्य प्रदेशातील काही पोलीस बहाद्दरांनी. इंदूरमधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांसह जिल्हा पोलीस लाइनमध्ये कॉन्स्टेबल, महिला हवालदार, उपनिरीक्षकांसह सुमारे 24 हून अधिक जणांनी आपले लग्न सोहळे कोरोनाच्या संकटाशी लढा देण्यासाठी पुढे ढकलले आहेत.

पोलिसांची कहाणी

इंदूरच्या जिल्हा पोलीस लाईनमध्ये हवालदार म्हणून तैनात असलेल्या पिंटूचे लग्न 1 मे रोजी मथुराच्या नेहासोबत अलिगढमध्ये होणार होते. बुधवार 29 एप्रिल रोजी लग्नाचा समारंभ सुरु होणार होता. लॉकडाऊनमध्येही कुटुंबातील सदस्यांनी निश्चित मुहूर्तावर लग्न करण्याचा आग्रह धरला खरा, परंतु हवालदार पिंटूने कोरोनामुळे ही वेळ लोकसेवेची असल्याचे सांगत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय केला. पिंटूच्या आग्रहासमोर कुटुंबानेही लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

ही एकट्या पिंटू हवालदाराची कथा नाही, अतिरिक्त पोलीस दलात तैनात असलेले पोलीस मुकेश निंगवाल यांचेही 2 मे रोजी लग्न  ठरले होते. कुटुंबाने संपूर्ण तयारी केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही रजाही मंजूर केली होती, परंतु संपूर्ण राज्यात वाढत्या कोरोनामुळे सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे मुकेशलाही लग्न पुढे ढकलावे लागले. टिळक नगर पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस नितेश मौर्य यांचेही 15 एप्रिल रोजी लग्न होणार होते. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, परंतु कोरोना संसर्गामुळे कर्व्य पार पाडण्यासाठी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्यावात महतत्वेवाचे म्हणजे  या सर्व घटनांत  कोणत्याही पोलिसाने साधी खंतही व्यक्त केली नाही. कारण देशसेवा ही सर्वात श्रेष्ठ आहे, हा या संगळ्यांचा विचार आहे.

सराफा पोलीस स्टेशन व भंवर कुआन पोलीस उपनिरीक्षक यांचेही लग्न याच काळात होणार होते. भंवरकुआ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल यांचे लग्न 2 मे रोजी लागणार होते. काही पाहुणे घरीही पोहोचले होते.पण त्यांनीही कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य दिले.

महिला पोलीसही यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन आहेत. अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही लॉकडाऊनमुळे त्यांचे लग्न पुढे ढकलले. ज्या दिवशी एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला हळद लावायची होती, त्यादिवशी ती चौकात कर्तव्य निभावत होती. यांच्यासारखे अनेक पोलीस कर्मचारी दिवस-रात्र ड्यूटी करीत आहेत.

संबंधित -Lockdownच्या अर्थसंकटाचा कसा सामना करणार? राहुल यांनी घेतली रघुराम यांची मुलाखत

First published: April 30, 2020, 7:21 AM IST

ताज्या बातम्या