ज्याने विरोध केला त्याला संपवलं, राम रहीमची अशीही झुंडशाही !

ज्याने विरोध केला त्याला संपवलं, राम रहीमची अशीही झुंडशाही !

याआधीही अनेक गुन्हे राम रहीमवर दाखल झाले आहेत.

  • Share this:

28 आॅगस्ट : साध्वी लैंगिक शोषण प्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलंय. कोर्टाच्या निर्णय़ाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. एवढंच नाहीतर 72 तासांपर्यंत मोबाईल आणि इंटरनेट सेवाही बंद करण्यात आलीये. तसंच 74 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण ?

2002 साली राम रहीम यांच्या डेऱ्यातील 2 साध्वींनी बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या दोन्ही महिला डेरा सच्चा सौदाच्या हेडक्वार्टरमध्ये राहत होत्या. हे हेडक्वार्टर चंदीगड पासून 260 किमी दूर हरियाणाच्या सिरसा इथं आहे.

या दोन्ही साध्वी महिलांनी तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी  यांना पत्र लिहुन आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितली. या पत्रात त्यांनी राम रहीमवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप केल होता. तसंच आणि बाबा रहीमवर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने सीबीआयला तपासाचे आदेश दिले.

पण ही पहिलीच घटना नाही ज्यात गुरमीत राम रहीमवर कोणता खटला दाखल झालाय. याआधीही अनेक गुन्हे राम रहीमवर दाखल झाले आहेत.

- सिरसामध्ये पत्रकार रामचद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणातही डेरा प्रमुखांचं नाव समोर आलं होतं. रामचंद्र हे 'पूरा सच' नावाने स्थानिक वृत्तपत्र चालवत होते. डेरा सच्चा सौदामध्ये सुरू असलेल्या गोरखधंद्याबाबत त्यांनी आपल्या वृत्तपत्रात लिखान केलं होतं. त्यामुळे संतापलेल्या राम रहीमच्या आदेशावरून डेरा सच्चाच्या कार्यकर्त्यांनी 24 आॅक्टोबर 2001 मध्ये रामचंद्र छत्रपती यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना 31 नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला.

- जुलै 2002 मध्ये राम रहीमवर डेरा सच्चा सौदाचे मॅनेजर रंजीर सिंहच्या हत्येचा आरोपही राम रहीमवर करण्यात आलाय. या प्रकरणी कोर्टाचा अंतिम निर्णय येण्याआधीच मागील वर्षी राम रहीमला या प्रकरणी हायकोर्टाकडून स्थगिती मिळाली होती.

2007 मध्ये राम रहीमने शिखांचे 10 वे गुरू गोविंद सिंह यांच्या सारखे कपडे परिधान केल्यामुळे राम रहीमवर चोहीबाजूने टीका झाली होती. त्यामुळे संतापलेले डेरा सच्चा सौदाचे समर्थक आणि सिखांमध्ये चकमक उडाली होती. भटिंडामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. यात 3 जणांचा मृत्यू झाला होता तर 100 हुन जास्त जण जखमी झाले होते.  यात पोलिसांचाही समावेश होता. या दरम्यान संपूर्ण शहरात 10 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती.

- 2014 मध्ये राम रहीमच्या पंथाशी जोडलेल्या जवळपास 400 समर्थकांनी राम रहीमवर नपुंसक करण्याचा आरोप केला होता. पुढे हे प्रकरण सीबीआयकडे गेलं पण तपासातून काही निष्पन्न झालं नाही.

- 2014 मध्ये डेरा सच्चा सौदाच्या हेडक्वार्टरमध्ये त्यांच्या साथीदारांना शस्त्र चालवण्याचं ट्रेनिंग दिलं जातं असा आरोप झाला होता. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

- 2015 मध्ये सेन्सार बोर्डाच्या लीला सॅमसन यांनी राम रहीमवर सिनेमा रिलीज करण्यासाठी दबाव टाकतात असा आरोप केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2017 02:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading