Home /News /national /

हा आहे खराखुरा 'बजरंगी भाईजान', आतापर्यंत 600 हून अधिक बेपत्ता मुलांना पोहोचवलं घरी

हा आहे खराखुरा 'बजरंगी भाईजान', आतापर्यंत 600 हून अधिक बेपत्ता मुलांना पोहोचवलं घरी

बजरंगी भाईजाननं (Bajrangi Bhaijan) पुन्हा एका बेपत्ता मुलीची नातेवाईकांशी भेट घडवून दिली आहे. हरियाणा पोलिसांचे (Haryana Police) एएसआय राजेश कुमार हे हरियाणातील बजरंगी भाईजान या नावानं प्रसिद्ध आहेत.

    अंबाला, 27 जानेवारी: हरियाणातील बजरंगी भाईजाननं (Bajrangi Bhaijan) पुन्हा एका बेपत्ता मुलीची नातेवाईकांशी भेट घडवून दिली आहे. हरियाणा पोलिसांचे (Haryana Police) एएसआय राजेश कुमार हे हरियाणातील बजरंगी भाईजान या नावानं प्रसिद्ध आहेत. राजेश कुमार यांनी आणखी एका बेपत्ता (Missing Girl)झालेल्या मुलीची तिच्या नातेवाईकांसोबत भेट घडवली आहे. ही दिव्यांग (Disabled) मुलगी ऑगस्ट महिन्यापासून अंबाला येथून बेपत्ता झाली होती. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी मुलीचा शोध सुरु केला होता, मात्र त्यांना आपल्या मुलीचा काही पत्ता लागला नव्हता. आपल्या मुलीचा शोध घेत कुटुंबाने कंटाळून हरियाणा पोलिसांचे ASI राजेश कुमार यांच्याकडे मुलीचा शोध घेण्याचं आवाहन केलं. याप्रकरणी ASI राजेश कुमार यांनी चोख काम करून मुलीची चौकशी केली आणि तिच्या कुटुंबीयांशी भेट करून दिली. मोठी बातमी: नक्षलवाद्यांनी उडवला रेल्वे ट्रॅक, अनेक गाड्यांची वाहतूक ठप्प  बजरंगी भाईजान या नावाने प्रसिद्ध असलेले हरियाणा पोलिसांचे ASI राजेश कुमार यांनी आणखी एका बेपत्ता मुलीची तिच्या कुटुंबीयांशी भेट करून दिली आहे. ऑगस्ट महिन्यापासून ही दिव्यांग मुलगी अंबाला येथून बेपत्ता झाली होती, तेव्हापासून तिच्या कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी चकरा मारल्या, मात्र मुलगी सापडली नाही. आपल्या मुलीच्या शोधात भटकत असलेले कुटुंब थकले आणि त्यांनी बजरंगी भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेल्या एएसआय राजेश कुमार यांना त्यांच्या मुलीचा शोध घेण्याची विनंती केली. 600 हून अधिक मुलांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट करून दिली हरियाणातील बजरंगी भाईजान म्हणून ओळखले जाणारे एएसआय राजेश कुमार यांनी आतापर्यंत 600 हून अधिक बेपत्ता मुलांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट करून दिली आहे. या प्रकरणातही एएसआय राजेश कुमार यांनी तीव्रता दाखवत मुलीची चौकशी सुरू केली. त्यानंतर एएसआय राजेश कुमार यांना मुलगी डेहराडून, उत्तराखंड येथे असल्याची माहिती मिळाली, तेथून त्यांनी मुलीला ताब्यात घेतले आणि आज अंबाला येथे कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. डेहराडूनमध्ये बेपत्ता मुलगी सापडली ASI राजेश कुमार यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यात मुलीची आई तिच्या मुलगी हरवल्याची तक्रार घेऊन त्यांच्याकडे आली होती, त्यानंतर मुलीच्या आईची अडचण पाहून त्यांनी तातडीने मुलीचा शोध सुरू केला. त्याला डेहराडून येथून ताब्यात घेण्यात आले आणि आज मुलीला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. पुण्यात Corona ची परिस्थिती खतरनाक, पॉझिटिव्हीटी दर वाचून डोक्याला लावाल हात बेपत्ता मुलीला भेटून कुटुंबीयांना खूप आनंद झाला आणि त्यांनी एएसआय राजेश कुमार यांचे आभार मानले. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी गेल्या 5 महिन्यांपासून बेपत्ता होती. मात्र अनेक ठिकाणी शोध घेऊनही ती सापडली नाही, त्यानंतर आज एएसआय राजेश कुमार यांनी आपल्या मुलीशी भेट करून दिली.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Haryana

    पुढील बातम्या