असं करा 2018मध्ये सुट्ट्यांचं प्लानिंग

असं करा 2018मध्ये सुट्ट्यांचं प्लानिंग

2018 मधल्या लाँग विकेन्डचा तुम्ही प्लॅन करत असाल तर तुम्हाला घाई करायला हवी.

  • Share this:

01 जानेवारी : नवीन वर्षात पदार्पण करताना आपण सगळेजण अनेक संकल्प करत असतो. आणि ज्यांना फिरण्याची आवड असते ते सुट्या पाहून सहली आणि पर्यटनाचं प्लॅनिंग करतात. पण 2018 मध्ये कशा सुट्ट्या आहेत. तुम्ही सहलींना

जाण्यासाठी कसं प्लानिंग कराल यासाठी हा खास रिपोर्ट.

2017 ला टाटा गुडबाय करताना पुढच्या वर्षातल्या, म्हणजेच 2018 मधल्या लाँग विकेन्डचा तुम्ही प्लॅन करत असाल तर तुम्हाला घाई करायला हवी.

कारण जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या पहिल्या तीन महिन्यातच तुम्हाला सलग मोठ्या सुट्ट्या मिळणार आहेत.

यावर्षी जानेवारी महिन्यात 26, 27 आणि 28 या तीन दिवशी सलग सुट्ट्या असतील. त्यामुळं तुम्ही लाँग वीकेन्डचा बेत आखू शकता.

त्यानंतर लगेचच, म्हणजे फेब्रुवारीमध्ये 17, 18 आणि 19 या तीन सलग सुट्ट्या लागून आल्यात. 17ला शनिवार 18ला रविवार आणि 19ला शिवजयंतीची सुट्टी असेल. त्यामुळे याचा सुट्ट्यांचा फायदाही तुम्ही घेऊ शकता.

मार्चमध्ये तर सुट्ट्यांचा चौकारच आहे.

29 मार्चला महावीर जयंती, 30 मार्चला गुडफ्रायडे, 31 मार्चला शनिवार आणि 1 एप्रिलला रविवार आलाय. मात्र या सलग सुट्ट्यानंतर वर्षभर सलग सुट्ट्या तशा कमीच आहे.

2018 मध्ये तुम्ही जर तुमचा लग्नाचा बेत असेल तर आत्तापासूनच हॉल आणि तत्सम गोष्टी बुक करा.

कारण पुढच्या वर्षी लग्नाचे जेमतेम मुहूर्त आहेत, तेव्हा आजपासूनच घाई केलेली बरी.

तेव्हा 2018 मधल्या सुट्टयांचं आणि महत्त्वांच्या कार्यक्रमाचं योग्य नियोजन करा. आणि पुढच्या वर्षी खूप धमाल करा.

First published: January 1, 2018, 9:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading