इथे मिळते 'मोदीजी 56 इंच थाळी' आणि वर मिळतो 370चा Discount

दिल्लीतील एक हॉटेल चर्चेत आले आहे आणि चर्चेत येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कलम 370 होय.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 07:25 PM IST

इथे मिळते 'मोदीजी 56 इंच थाळी' आणि वर मिळतो 370चा Discount

नवी दिल्ली, 09 सप्टेंबर: भारतीय लोक खाद्यप्रिय असतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. विविध राज्यातील खाद्य पदार्थ देशभरात लोकप्रिय आहेत. देशातील अनेक हॉटेलमध्ये शाही भोजन मिळते. अशी हॉटेल्स ही खाद्य प्रेमीसाठी पर्वणीची असतात. दिल्लीतील असेच एक हॉटेल आता चर्चेत आले आहे आणि चर्चेत येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कलम 370 (Article 370) तसेच येथे मिळणारी 'मोदी जी 56 इंच थाली' (Modi Ji 56-inch Thali)होय.

दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरातील आडरेर 2.1 हॉटेल चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir)ला विशेष राज्याचा दर्जा देणारे कमल 370 रद्द केल्यानंतर या हॉटेलने सुपर साईज थाळीवर 370 रुपयांची सूट दिली आहे. अर्थात ही सवलत घेण्यासाठी तुम्ही काश्मीरचे नागरीक असणे गरजेचे आहे. या हॉटेलमध्ये मिळणारी शाकाहारी थाळीची किमत 2 हजार 370 रुपये तर मांसाहारी थाळी 2 हजार 669 रुपयांची आहे. या थाळीमध्ये देशातील सर्व राज्यातील खाद्यपदार्थांची चव चाखता येते. काश्मीरी पुलाव, खमीर रोटी, नदरूची शमी, दम आलूसह अन्य अनेक पदार्थांचा समावेश आहे.

याशिवाय हॉटेलमध्ये विविध थाळी मिळतात. त्यातील लोकप्रिय असलेल्या थाळी म्हणजे 'मोदी जी 56 इंच थाली' आणि बाहुबली पिक्चर (Baahubali Pitcher)या दोन थाळींचा समावेश आहे. दिल्लीकर आणि बाहेरून येणारे अनेक पर्यटक 'मोदी जी 56 इंच थाली' थाळी खाण्यासाठी हॉटेलमध्ये येतात. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर या हॉटेलने युनायटेड इंडिया थाळी (United India Thali) सुरु केली होती.

शाही भोजन आणि त्याला देण्यात आलेल्या नावामुळे या हॉटेलमधील थाळीविषय सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

VIDEO : एकादशीला नासाने कसं सोडलं यान? ऐका भिडे गुरुजींचा तर्क

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 07:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...