News18 Lokmat

यूएईमधली ही हवाई कंपनी विकत घेऊ शकते जेट एअरवेज

'जेट एअरवेज' या 26 वर्षं जुन्या विमान कंपनीला आर्थिक संकटातून कसं बाहेर काढायचं, असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला आहे. संकटात सापडलेली ही कंपनी विकत घेण्यासाठी संयुक्त अरब अमिरात मधल्या एका बड्या हवाई कंपनीने तयारी दाखवली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 08:27 PM IST

यूएईमधली ही हवाई कंपनी विकत घेऊ शकते जेट एअरवेज

नवी दिल्ली, 11 एप्रिल : जेट एअरवेज आर्थिक संकटात आहे.आर्थिक चणचणीमुळे जेट एअरवेजला आपल्या तीन चतुर्थांश विमानांची उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. कर्जबाजारीच्या खाईत सापडलेल्या या नामांकित विमान कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार देण्याएवढेही पैसे नाहीत.

या 26 वर्षं जुन्या विमान कंपनीला आर्थिक संकटातून कसं बाहेर काढायचं, असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला आहे. संकटात सापडलेली ही कंपनी विकत घेण्यासाठी संयुक्त अरब अमिरात मधल्या एका बड्या हवाई कंपनीने तयारी दाखवली आहे. ही कंपनी आहे, एतिहाद एअरवेज. ही कंपनी जेटमधली आपली भागीदारी 49 टक्के करणार आहे.एतिहादची जेटमध्ये आधीच 24 टक्के भागीदारी आहे.

जेट एअरवेजच्या या भागीदारीचा लिलाव 12 एप्रिलला केला जाईल.'एतिहाद एअरवेज'शिवाय आणखी कोणत्याही कंपनीने ही बोली लावलेली नाही.

जेट एअरवेजच्या 7 विमानांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर इंडियन ऑयल ने जेटला होणाऱ्या इंधनाचा पुरवठा बंद केला आहे.

'एतिहाद' एअरवेजने 2016 मध्ये भारतासाठी रॉयल सेवा सुरू केली होती. एतिहाद एअरवेजची विमानं लंडन, सिडनी आणि न्यूयॉर्कलाही जातात. त्याखालोखाल भारताचा क्रमांक लागतो.एतिहाद ही जगातल्या महागड्या एअरलाइन्सपैकी एक आहे.

Loading...

जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल एतिहाद ने भारतीय स्टेट बँकेशी चर्चा केली होती. जेटचे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात यावं आणि अधिकाधिक गुंतवणुकीला परवानगी देण्यात यावी, असं एतिहाद ने म्हटलं होतं. पण एतिहाद जेटमध्ये 49 टक्केच गुंतवणूक करू शकते, असा निर्णय भारतीय स्टेट बँकेने दिला.

जेट एअरवेज ही भारतातली नामांकित कंपनी इतकी अडचणीत आहे की एतिहादच्या बहुतांश अटी या कंपनीने मान्य केल्या आहेत. एतिहादने आपली भागीदारी वाढवल्यानंतर तरी कंपनीवरचं आर्थिक संकट टळेल आणि नव्याने 'टेक ऑफ' होईल, अशी जेटच्या व्यवस्थापनाला आशा आहे.

======================================================================================================================================================================

VIDEO: ..तर लोकांमध्ये अधिक उत्साह राहिला असता - प्रफुल्ल पटेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 08:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...