Home /News /national /

क्वारंटाइन महिलेवर हेल्थ वर्करचा अत्याचार, निगेटिव्ह रिपोर्ट देतो सांगून घरी बोलवलं

क्वारंटाइन महिलेवर हेल्थ वर्करचा अत्याचार, निगेटिव्ह रिपोर्ट देतो सांगून घरी बोलवलं

कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह देतो असं सांगून त्याने तिला घरी बोलावलं आणि तिच्यावर जबरदस्ती केली.

    तिरूवनंतपूरम 07 सप्टेंबर: कोरोनाने देशात थैमान घातलं आहे. रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना घरीच होम क्वारंटाइन राहण्यास परवानगी दिली जात आहे. केरळमध्ये होम क्वारंटाइन असलेल्या महिलेवरच बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका हेल्थ वर्करनेच हे कृत्य केल्याचं स्पष्ट झाल्यानं तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तिरूवनंतपूरम इथे एक महिला आपल्या घरीच क्वारंटाइन होती. महिलेची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला जास्त लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे महिलेला घरीच होम क्वारंटाइनमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर  तिला हेल्थ वर्करने महिलेला घरी बोलावलं. कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह देतो असं सांगून त्याने तिला घरी बोलावलं आणि तिच्यावर जबरदस्ती केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. पोलिसांनी त्या हेल्थ वर्करला ताब्यात घेतलं असून चौकशी करत आहेत. दरम्यान,  देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विस्फोट झालेला दिसत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 42 लाखांहून अधिक झाली आहे. तर, एकाच दिवसात आज तब्बल 90 हजार 802 रुग्ण सापडले. तर, 1016 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या सध्या 42 लाख 04 हजार 614 झाली आहे. तर, सध्या देशात 8 लाख 82 हजार 542 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 32 लाख 50 हजार 429 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील मृतांचा आकडा हा 71 हजार 642 झाला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं दिलेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबरपर्यंत देशात 4 कोटी 95 लाख 51 हजार चाचण्या करण्यात आल्या. यात एकाच दिवसात 7 लाख 20 हजार चाचण्या झाल्याची नोंद आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या