तिरुवनंतपुरम, 17 एप्रिल : कोरोनाग्रस्तांची संख्या भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर लोकांच्या चाचण्या करण्याचे काम सुरू आहे. यासाठी आता केरळमधील काही संशोधकांनी एक टेस्ट कीट तयार केली आहे. याद्वारे कमी किमतीत आणि फक्त 2 तासांत कोरोनाचे निदान होऊ शकत.
तिरुवनंतपुरम येथील श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अॅण्ड टेक्नोलॉजीने (SCTIMST) ही चाचणी किट तयार केली आहे. या कीटचा वापर करून अगदी कमी खर्चात कोरोनाचे निदान होऊ शकेल. चित्राने तयार केलेली GeneLAMP-N किटला कोव्हिड-19 चाचणीसाठी इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (ICMR) मंजूरीची गरज आहे. SCTIMSTचे संचालक आशा किशोर यांनी, “आयसीएमआरने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), आलप्पुझा यांना चाचण्या मान्य करण्यासाठी अधिकृत केले होते आणि सीडीएससीओने त्यासाठी परवाना दिला होता. एनआयव्हीच्या चाचणीत असे दिसून आले आहे की चित्रा GeneLAMP-N आरटी-पीसीआर निकालाबरोबर शंभर टक्के अचूकता आणि एकरुपता दर्शविली आहे", अशी माहिती दिली.
वाचा-रतन टाटा यांना 'भारतरत्न' द्या, सोशल मीडियावर ऑनलाईन याचिकेला लाखोंचा पाठिंबा
ही किट SARS-CoV-2ची N Geneचा शोध घेते. यासाठी व्हायरल न्यूक्लिक अॅसिडचे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस लूपचा वापर केला जात आहे. याचा वापर करून अवघ्या 10 मिनिटांत जनुकांचा (genes) शोध घेतला जाऊ शकतो. तर, दोन तासांपेक्षा कमी वेळे कोरोनाचे निदान होऊ शकते.
वाचा-COVID-19 : बँक, कृषि क्षेत्र आणि सामान्य नागरिकांसाठी RBIचे महत्त्वाचे निर्णयएकाचवेळी 30 नमुन्यांची चाचणी होणार
SCTIMSTचे संचालक आशा किशोर यांनी यावेळी, “मशीनमध्ये एकाच बॅचमध्ये तीस नमुन्यांची चाचणी केली जाऊ शकते. त्यामुळे एका दिवसात जास्तीत जास्त लोकांची तपासणी केली जाऊ शकते. जिल्हा रुग्णालयांच्या प्रयोगशाळांमध्येही चाचणी सुविधा सहजपणे सुरू करता येईल”, असे सांगितले. दरम्यान, SCTIMSTने GeneLAMP-N चाचणी किट आणि चाचणी उपकरणासह विशिष्ट आरएनए एक्सट्रॅक्शन किट देखील विकसित केल्या आहेत. चित्रा जनलॅलॅम्प-एनच्या या संशोधन आणि विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने पूर्णपणे अर्थसहाय्य दिले.
वाचा-मेच्या पहिल्या आठवड्यात मिळणार चांगली बातमी, गृह मंत्रालयाने दिले संकेत
संकलन, संपादन-प्रियांका गावडे
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.