मराठी बातम्या /बातम्या /देश /

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लॉकडाऊनची घोषणा, 22 दिवसांपासून 36 वऱ्हाडी मंडळींचे नवरीमुलीच्या गावात बस्तान

लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लॉकडाऊनची घोषणा, 22 दिवसांपासून 36 वऱ्हाडी मंडळींचे नवरीमुलीच्या गावात बस्तान

गावाबाहेरील एका शाळेमध्ये ही 36 वऱ्हाडी मंडळी राहतात. आता तर पैसे संपल्याने गावकरी त्यांना खाण्याची मदत करीत आहेत

  • Published by:  Meenal Gangurde

छपरा, 14 एप्रिल : 'लग्न करुन फसलो' असं अनेकदा लोक म्हणतात. मात्र याचा अनुभव 22 दिवसांपूर्वी लग्न झालेला नवरामुलगा घेत आहे. म्हणजे यात नवरीमुलीचा काहीही दोष नाही. ज्या दिवशी नवरदेवाची वरात नवरीमुलीच्या गावी आली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करण्यात आली. नवरदेव कलकत्त्याहून वरात घेऊन छपरामधील मांझी या गावी आला खरा मात्र लॉकडाऊन लागू होताच रेल्वेसह सर्व वाहतूक बंद झाली. अशा परिस्थितीत नवरीमुलीच्या कुटुंबीयांनी नवरा-नवरी आणि वऱ्हाडींना गावाबाहेर एक शाळेत राहण्याची जागा करुन दिली आहे.

गावातील शाळेत 36 वऱ्हाडी राहत आहेत

येथे 22 दिवसांपासून 36 वऱ्हाडी शाळेत राहत आहेत. कसे बसे 21 दिवसांनंतर आता या वऱ्हाडींकडील सर्व पैसे संपले आहेत. आता गावातील मंडळीच्या मदतीने त्यांना जेवण पुरविलं जात आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊनची मर्यादा वाढवल्यानंतर आता या लोकांची चिंता वाढली आहे. सर्व पैसे संपल्यानंतर आता आणखी 21 दिवस कसे जाणार या विचाराने वऱ्हाडी त्रस्त झाले आहेत. सर्व वऱ्हाडी पश्चिम बंगालमधील भिखमहि गावातील छपरातील मांझी या भागात आले आहेत. या लोकांनी घरी जाण्यासाठी प्रशासनाकडे मदतीचं आवाहन केलं आहे. मात्र झारखंड प्रशासनाने त्यांची विनंती फेटाळली.

नवरीमुलगीही राहतेय वऱ्हाडीसोबत

वऱ्हाडींना होणारा त्रास बघून नवरीमुलगी खुशबूदेखील माहेरी न राहता त्यांच्यासह शाळेत राहत आहे. तिचं म्हणणं आहे की ते लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. मात्र गावकऱ्यांनी त्यांची खूप मदत केली आहे.

संबंधित -

मदतीसह माणुसकीचा ओघ, कोरोनाच्या लढ्यासाठी भिकाऱ्यांचे PM Cares ला 3100 रु. दान

'तुम्ही जगाला फसवलं; आता तरी सुधारा नाहीतर...', ट्रम्प यांनी चीनला दिली धमकी

First published:

Tags: Coronavirus