News18 Lokmat

13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी

मुलानं लिहिलेच्या प्रेम पत्रानंतर झालेल्या भांडणामध्ये 10 जण जखमी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 23, 2019 02:45 PM IST

13 वर्षाच्या मुलाचं 10 वर्षाच्या मुलीला Love Letter, भांडणात 10 जखमी

सुरत,22 फेब्रुवारी : प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. पण प्रेम व्यक्त करताना परिस्थितीचं भान राखणं देखील तितकंच महतत्वाचं असतं. शिवा. प्रेम एकतर्फी असेल तर? याच एकतर्फी प्रेमापायी गुजरातमधील दोन कुंटुंबामध्ये तुफान हाणामारी झाली. त्यामध्ये 10 जण जखमी झाले आहेत. सुरेंद्रनगरमध्ये ही घटना घडली आहे.


13 वर्षाच्या मुलानं 10 वर्षाच्या मुलीला I Love You म्हटलं. त्यानंतर हे सारं प्रकरण अधिक गंभीर झालं. दोन्ही मुलांच्या कुटुंबामध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये 10 जण जखमी झाले. सध्या जखमींवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दोन्ही कुटुंबातील लोकांना एकमेकांवर हल्ला केल्याचे आरोप केले आहेत.


मुलगा मुलीची सतत छेड काढत होता. तिला I Love You बोलत होता. शिवाय, त्यानं मुलीला लव्ह लेटर देखील लिहिलं होतं. गुरूवारी हे सारं प्रकरण समोर आलं. मुलीनं याबाबतची तक्रार आपल्या घरी केली.

Loading...


या साऱ्या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी मुलीचे नातेवाईक मुलाच्या घरी गेले. यावेळी बोलत असताना मुलाच्या नातेवाईकांनी मुलीच्या नातेवाईकांवर हल्ला केला. यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर, मुलाच्या नातेवाईकांनी मुलीच्या नातेवाईकांच्या डोळ्यात मिर्चीची पूड फेकली. शिवाय, लोखंडी रॉडनं देखील हल्ला केला. ज्यामध्ये 6 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


तर, मुलीच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामध्ये चार लोक जखमी झाले आहेत. शिवाय, आरोप खोटे असून मुलानं लव्ह लेटर लिहिलं नसल्याचं मुलाच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.

VIDEO : बंगळुरूच्या एअर शोमध्ये मोठी आग, 30 गाड्या जळून खाक


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2019 02:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...