Honey Trap : देशातलं सगळ्यात मोठं सेक्स रॅकेट, 4 हजार Video, नेते, अधिकारी टार्गेटवर!

Honey Trap : देशातलं सगळ्यात मोठं सेक्स रॅकेट, 4 हजार Video, नेते, अधिकारी टार्गेटवर!

या गँगकडून तब्बल 4 हजार Sex Videos, Photos, Audio Files जप्त करण्यात आल्या आहेत. यात Sex Chats आणि अत्यंत आक्षपार्ह फोटो असल्याची माहिती SITने दिली आहे.

  • Share this:

भोपाळ 26 सप्टेंबर :  सर्व देशभर गाजत असलेल्या मध्य प्रदेशातल्या Honey Trap प्रकरणाने प्रचंड खळबळ उडालीय. या प्रकरणात आता दररोज नव नवे खुलासे होत आहेत. यात अनेक गोष्टी पुढे येत असून त्यातून धक्कादायक माहिती बाहेर येतेय. ही माहीती अतिशय स्फोटक असून त्यातून अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या माहितीने अनेक बड्या आसामी अडचणीत येण्याचीही शक्यता आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगडसह दिल्लीतही या रॅकेटची पाळमुळं असल्याची माहिती पुढे येत असल्याने पोलिसांच्या हाती स्फोटक माहिती आलीय. मध्य प्रदेश पोलिसांनी आता तिसरं रेक्स रॅकेट पकडल्याचा दावा केलाय. यातल्या आरोपींकडूनही खळबळजनक माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे.

'त्या' 15 सेकंदाच्या Tik Tok VIDEO मुळे बदललं आयुष्य

मध्य प्रदेशात या आधी Honey Trapच्या दोन मोठ्या गँगचा पर्दाफाश झाला होता. यामुळे देशभर प्रचंड खळबळ उडाली होती. याची चर्चा सुरू असतानाच आता तीसऱ्या गँगचाही पर्दाफाश झाला असून अजुन अशा किती गँग आहेत असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. इंदूर इथून पहिल्या गँगला अटक करण्यात आली. नंतर भोपाळच्या निशातपूरा या भागात दुसरी गँग सापडली तर आता कोलार विभागात तिसरी गँग सापडली आहे. या प्रकरणात माहिती मिळाल्यावर पोलिसांनी संशयास्पद घरावर छापा घातला यात काही तरुणी आणि तरुण आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले आहेत. पोलिसांच्या विशेष पथकाने 11 जणांना अटक केलीय.

पहिलं प्रकरण उघडकीस आल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना( SIT) केली होती. या पथकाने आत्तापर्यंतच्या छाप्यांमध्ये या गँगकडून तब्बल 4 हजार Videos, Photos, Audio Files जप्त करण्यात आल्या आहेत.  यात Sex Video, Sex Chats आणि अत्यंत आक्षपार्ह फोटो असल्याची माहिती SITने दिली आहे. या छाप्यात काही डायऱ्याही सापडल्या असून त्यात कोडवर्ड्समध्ये अधिकाऱ्यांची नावं देण्यात आली आहेत.

उतार वयात मुलांनी घराबाहेर काढलं, हार न मानता आजीबाईंनी जिंकली 100 मीटर वॉक रेस

या गँगच्या जाळ्यात राजकीय नेते, बडे बडे IAS अधिकारी, मोठे व्यापारी आणि अशा अनेक नामांकितांचा समावेश आहे. या सगळ्यांची नावंही त्या डायऱ्यांमध्ये असल्याची माहिती SITने दिलीय. या गँगमध्ये तरुणी, दलाल आणि अनेकांचा समावेश आहे. या गँगची एक खास मोड्स ऑपरेंडी होती. या गँगमधल्या तरुणी या राजकीय नेते आणि IAS अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढत आणि त्यांच्याशी शारीरीक संबंध प्रस्थिपीत करून त्याचे VIDEO तयार केले जात होते.

... तर निकालाची अपेक्षा करू नका; अयोध्याप्रकरणी सरन्यायाधीशांचे मोठे वक्तव्य

या VIDEOच्या माध्यमातून नंतर त्या अधिकारी आणि नेत्यांना ब्लॅकमेल केलं जात असे. त्यांच्याकडून पैसे उकळून काही अवैध कामेही केली जात असे. याचा खुलासा झाल्यानंतर अनेक नेते आणि अधिकाऱ्यांचे दाबे दणाणले आहेत. SIT हे सर्व पुरावे तपासून पाहत असून त्यानुसार तपासाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 26, 2019, 3:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading