Home /News /national /

PM मोदींची मोठी घोषणा, रविवारी सोशल मीडिया सोडणार

PM मोदींची मोठी घोषणा, रविवारी सोशल मीडिया सोडणार

New Delhi: Prime Minister Narendra Modi at the silver jubilee celebration of National Human Right Commission, in New Delhi, Friday, Oct 12, 2018. (PTI Photo/Atul Yadav)  (PTI10_12_2018_100098B)

New Delhi: Prime Minister Narendra Modi at the silver jubilee celebration of National Human Right Commission, in New Delhi, Friday, Oct 12, 2018. (PTI Photo/Atul Yadav) (PTI10_12_2018_100098B)

सोशल मीडियासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे.

    नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच नवीन संकल्पना मांडण्यासाठी राजकारण्यांकडून सोशल मीडियाचा वापर केला जातो. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब हे त्यासाठी प्रभावी व्यासपीठ समजलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतात. मात्र याच सोशल मीडियासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. 'या रविवारी मी ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब यावरील माझी खाती सोडण्याचा विचार करत आहे,' असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींनी असं अचानक सोशल मीडिया सोडण्याचा विचार व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणारे राजकीय नेते आहेत. इंस्टाग्रामवर 3 कोटी 52 लाख, ट्विटरवर 5 कोटी 33 लाख आणि फेसबुकवर 4 कोटी 45 लाख लोक मोदींना फॉलो करतात, तर नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनेलला 45 लाख सबस्क्राईबर आहेत. राहुल गांधींचा मोदींना टोला पंतप्रधान मोदींनी असं ट्वीट करताच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी त्यांना टोला लगावला आहे. 'सोशल मीडिया नाही...द्वेष सोडा,' असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. राहुल गांधीही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांचे ट्विटवरवर 12.1 मिलियन फॉलोअर्स तर फेसबुकवर 3 मिलियन फॉलोअर्स आहेत. फोटोसाठी लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामवरही राहुल गांधींचे अकाउंट आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे 9 लाख 87 हजार फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर राहुल गांधींच्या नावाने चॅनेल आहे. या चॅनेलचेही 1 लाख 68 हजार सबस्क्रायबर्स आहेत.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Narendra modi, Social media, Twitter

    पुढील बातम्या