नळच काय उशा, गाद्याही रेल्वेतून चोरी ; वर्षभरात 73 लाखांचं रेल्वेचं नुकसान

नळच काय उशा, गाद्याही रेल्वेतून चोरी ; वर्षभरात 73 लाखांचं रेल्वेचं नुकसान

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागातच 56 ट्रेन्समधून एकूण 71 लाखाचे उश्या, गाद्या, चादरी, टॉवेल चोरीला गेले आहेत. तर काही ट्रेन्समधून तर नळ, मग, फ्लॅश पाईपसुद्धा चोरांनी चोरले आहेत.

  • Share this:

18 ऑगस्ट: ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस आणि तेजस एक्प्रेसमध्ये झालेल्या चोऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर असतानाच एक नवीन बाब समोर आली आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात जवळपास 73 लाख रूपये किमतीचं रेल्वेमधून सामान चोरीला गेलं आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागातच 56 ट्रेन्समधून एकूण 71 लाखाचे उश्या, गाद्या, चादरी, टॉवेल चोरीला गेले आहेत. तर काही ट्रेन्समधून तर नळ, मग, फ्लॅश पाईपसुद्धा चोरांनी चोरले आहेत.

मागच्या आठवड्यात ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसमधील 20 यात्रेकरूंचे लाखो रूपयांचे सामान चोरीला गेलं होतं. ही चोरी या वर्षभरातील सगळ्यात मोठी चोरी असल्याचंही म्हटलं जातंय.

First published: August 18, 2017, 8:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading