Home /News /national /

गांधींच्या जयंतीदिनी राजघाटावर टोपी घातलेल्या चोरांची गर्दी, VC चा खळबळजनक आरोप

गांधींच्या जयंतीदिनी राजघाटावर टोपी घातलेल्या चोरांची गर्दी, VC चा खळबळजनक आरोप

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्यानिमित्ताने कलकत्ता स्थित विश्वविद्यालय परिसरात ते एका सभेला संबोधित करत होते

  कलकत्ता, 22 फेब्रुवारी : पश्चिम बंगालचे प्रसिद्ध विश्व भारती विश्वविद्यालयाचे (Vishwa Bharati University) कुलपती विद्युत चक्रवर्ती यांनी खळबळजन आरोप केला आहे. त्यांनी केलेले वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. चक्रवर्ती शुक्रवारी म्हणाले, देशाची राजधानी दिल्ली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या समाधी स्थळावर 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी चोरांची गर्दी होते. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्यानिमित्ताने कलकत्ता स्थित विश्वविद्यालय परिसरात ते एका सभेला संबोधित करत होते. त्यावेळी चक्रवर्ती म्हणाले, 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींच्या जन्मदिनी राजघाटमध्ये जाणं अवघड होतं. देशभरात मोठ मोठे चोर येथे टोपी घालून येतात आणि उरलेल्या वर्षभरात जे गांधीजींना पटलं नाही तेच करतात. विश्वविद्यालयाची परंपरा पुन्हा आणणार विश्वविद्यालय परिसरात एका सभेला संबोधित करताना चक्रवर्ती म्हणाले की, अनेकजण महात्मा गांधींना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करतात. त्यांच्या साध्या जीवनशैलीविषयी भरभरुन बोलतात. मात्र बोलणारे स्वत: या शब्दांवर विश्वास करीत नाही. तर भ्रष्टाचार करतात. एका मीडिया रिपोर्टनुसार विश्वविद्यालयाच्या पब्लिक रिलेशन ऑफिसरने सांगितले, त्यांनी फक्त एक उदाहरण दिलं होतं. या विधानातून त्यांना सद्याच्या स्थितीविषयी भावना व्यक्त करावयाची होती. चक्रवर्ती सांगू इच्छित होते की अशी परिस्थिती विश्व भारती विश्वविद्यालयातील जुनी परंपरान पुन्हा आणायची आहे. यापुढे जाऊन चक्रवर्ती असंही म्हणाले की, अनेकजण विश्व भारती विश्वविद्यापीठाला सोन्याचं अंडं देणारी कोंबडी म्हणतात. मात्र विश्वविद्यालय सध्या आर्थिक संकटात असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. रवींद्रनाथ टागोरांद्वारा स्थापित करण्यात आलेल्या संस्थेला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर चक्रवर्तींनी राग व्यक्त केला आहे. हेही वाचा -

  ऑपरेशन बांगलादेशी! पुण्यात मनसेच्या ५० कार्यकर्त्यांनी टाकली धाड

  प्रेम विवाह केला म्हणून लेकीचा घेतला जीव, हत्या करत शव 80 किमी दूर नाल्यात फेकलं

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Mahatma gandhi, Mahatma gandhi birth anniversary

  पुढील बातम्या