मराठी बातम्या /बातम्या /देश /चोरीचा अजब प्रकार! PPE किट घालून 13 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

चोरीचा अजब प्रकार! PPE किट घालून 13 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

दिल्लीच्या कालकाजी मार्केटमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर चोरीची मोठी घटना घडली होती. घटनेनंतर काही तासांतचं पोलिसांनी चोरांना पकडल्याचा दावा केला आहे.

दिल्लीच्या कालकाजी मार्केटमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर चोरीची मोठी घटना घडली होती. घटनेनंतर काही तासांतचं पोलिसांनी चोरांना पकडल्याचा दावा केला आहे.

दिल्लीच्या कालकाजी मार्केटमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर चोरीची मोठी घटना घडली होती. घटनेनंतर काही तासांतचं पोलिसांनी चोरांना पकडल्याचा दावा केला आहे.

नवी दिल्ली, 21 जानेवारी : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एका अजब चोरीची (Theft) सध्या चर्चा सुरू आहे. आग्नेय दिल्लीतील कालकाजी भागात नुकतीच एका सराफी दुकानात (Jewellery Shop) मोठी चोरी झाली. या चोरीचं वैशिष्ट्य म्हणजे चोरानं चक्क पीपीई किट (PPE Kit) घालून ही चोरी केली.

कालकाजी मार्केटमध्ये असलेल्या अंजली ज्वेलर्सच्या शोरूममधून चोराने तब्बल 25 किलो वजनाचे दागिने चोरून नेले असून, त्यांची किंमत कोट्यवधी रुपयांत आहे.

सकाळी दुकान उघडलं तेव्हा दुकानातील कोट्यवधी रुपयांचे दागिने गायब असल्याचे आढळलं आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera)एक पीपीई किट घातलेला चोर दुकानाच्या पायऱ्या उतरताना दिसून आल्याचं स्थानिक दुकानदारांनी सांगितलं.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चौकशी सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार, या दुकानात नेहमीच सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तैनात असतात आणि घटना घडलेल्या रात्रीही चार ते पाच सशस्त्र सुरक्षा कर्मचारी इथं तैनात होते. दक्षिण पूर्व दिल्ली विभागाचे (South East Delhi )पोलिस उप महाअधीक्षक (DYSP) आर. पी मीणा यांनी या वृत्ताला दुजोरा देत, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याचा तपास सुरू असल्याचं सांगितलं. मात्र अद्याप चोरी झालेल्या दागिन्यांच्या किंमतीबाबत दुकानाच्या मालकानं काहीही सांगितलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

PPE किट घातलेला चोर :

या चोरी प्रकरणी तपास करताना पोलिसांना CCTV फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती पीपीई किट घालून दुकानाच्या पायऱ्या उतरताना आढळली. त्यानं आपला चेहरा आणि शरीर पूर्णपणे झाकलेलं होतं जेणेकरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचा चेहरा दिसणार नाही.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला पकडल्याचा दावा केला असून, त्याचं नाव शेख नूर असल्याचं सांगितलं आहे. त्याच्याकडून 13 कोटी रुपयांचे 25 किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

हे देखील वाचा -  भयंकर! लॉकडाऊनमुळे मोठं नुकसान झाल्यानं प्रतिष्ठित शाळेचा मालक बनला ब्लॅकमेलर!

कोरोना साथीच्या काळात संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टर्स पीपीई किट घालून रुग्णावर उपचार करत आहेत. डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी अशा रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना पीपीई किट घालणे अनिवार्य आहे. त्याचा असाही कोणी उपयोग करेल अशी कल्पनाही कोणी केली नसेल. पण या चोरानं स्वतःची ओळख लपवण्यासाठी या पीपीई किटचा उपयोग केला याबद्दल नवल व्यक्त करण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Delhi, Police