मराठी बातम्या /बातम्या /देश /

‘ते एकत्र येऊन आनंद साजरा करीत आहेत’; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप

‘ते एकत्र येऊन आनंद साजरा करीत आहेत’; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप

ओमर अब्दुल्लांनी या फोटोंवर नाराजी व्यक्त केली आहे

ओमर अब्दुल्लांनी या फोटोंवर नाराजी व्यक्त केली आहे

ओमर अब्दुल्लांनी या फोटोंवर नाराजी व्यक्त केली आहे

  • Published by:  Meenal Gangurde
श्रीनगर, 5 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या राममंदिराच्या भूमिपूजनानंतर देशभरातील राम भक्तांनी मिठाई वाटून तर काहींनी फटाके फोडून आनंद साजरा केला. दुसरीकडे जम्मू काश्मिरमध्ये कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त मिठाई वाटप केलं. यावर माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ल यांनी आक्षेप नोंदवला. अब्दुल्ला यांनी ट्विट करुन यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवली आहे. बासिर झारगर या काश्मिरातील छायाचित्रकाराने श्रीनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मिठाई वाटप करुन आनंद साजरा केल्याचा फोटो ट्विट केला आहे. या फोटांमध्ये भाजप कार्यकर्ते एकत्र येऊन मिठाई वाटप करताना दिसत आहे. या फोटांवर अब्दुल्ला यांनी नाराजी व्यक्त केली. भाजप त्यांचा ढोंगीपणा दाखवत आहे. ते लोक (भाजप कार्यकर्ते) एकत्र येऊन आनंद साजरा करीत आहेत. मात्र इतर सर्वजण एकत्र येऊन जम्मू काश्मिरमध्ये काय सुरू आहे याबद्दल चर्चाही करू शकत नाही. असं ट्विट अब्दुल्ला यांनी या फोटोंवर प्रतिक्रिया देताना व्यक्त केलं आहे. गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद 370 रद्द करण्यात आले.
First published:

Tags: Ayodhya ram mandir

पुढील बातम्या