मराठी बातम्या /बातम्या /देश /

Corona काळात नेतागिरी सोडून लोकांच्या मदतीला धावले 'हे' कोरोना योद्धे

Corona काळात नेतागिरी सोडून लोकांच्या मदतीला धावले 'हे' कोरोना योद्धे

असे अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते आहेत जे कोरोनाच्या या संकटात कोरोना योद्धा बनत रुग्णांची मदत करत आहेत.

असे अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते आहेत जे कोरोनाच्या या संकटात कोरोना योद्धा बनत रुग्णांची मदत करत आहेत.

असे अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते आहेत जे कोरोनाच्या या संकटात कोरोना योद्धा बनत रुग्णांची मदत करत आहेत.

नवी दिल्ली, 21 एप्रिल: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (corona second wave) कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अशात देशातील तीन युवा नेत्यांनी कौतूकास्पद काम केलं आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, भाजपाच्या चारू प्रज्ञा आणि आम आदमी पक्षाचे तिमरपूरचे आमदार दिलीप पांडे या तिघांनी रुग्णांना प्लाझ्मा, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून देण्यासाठी खूप मदत केली आहे.

या संदर्भातील वृत्त इंडिया टूडेनी दिलं आहे. तर मग नेतागिरी सोडून जनतेच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या या नेत्यांबद्दल थोडं जाणून घेऊया.

बी. व्ही. श्रीनिवास 

श्रीनिवास यांची 26 जणांची एक टीम आहे. ही टीम रायसीना रोडच्या युवक काँग्रेसच्या कार्यालयातील कंट्रोल रुममधून काम करते. कंट्रोल रुममध्ये सात जणांची टीम आणि हॉस्पिटल्समध्ये 19 जण काम करतात. ते दिल्लीमध्ये रुग्णांना कोणतीही गरज पडल्यास मदत करतात. 41 वर्षीय श्रीनिवास यांच्याकडे ट्विटरवरून सर्वांत जास्त मदतीची मागणी झाली आहे.

सध्या श्रीनिवास सोशल मीडियाच्या माध्यमातून रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यात समन्वय साधण्याचं काम करतात. “कोणालाही वैद्यकीय मदतीची आवश्यकता असल्यास तत्काळ मला संपर्क करा,” असं आवाहन श्रीनिवास यांनी नागरिकांना केलं आहे. त्यांच्या या आवाहनाला नागरिक प्रतिसाद देत आहेत. आम्ही शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, असं श्रीनिवास सांगतात. त्यांच्यामते, पहिल्या लाटेपासून धडा घेत आपण दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयार राहायला पाहिजे होतं. लोकांना आयसीयू बेड्स, प्लाझ्मा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची सगळ्यात जास्त कमतरता भासत आहे. तर दुसरीकडे ‘भारत हा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती करणारा देश असूनही आपल्याला ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय, हे चिंताजनक आहे,’ असंही श्रीनिवास म्हणाले.

मुलीने केली आईची शेवटची इच्छा पूर्ण.. 'रमजान महिन्यात मरण आलं, दहन करण्याऐवजी दफन केलं'

चारू प्रज्ञा, बीजेपी

भाजपाच्या ३६वर्षीय युवा नेत्या चारु प्रज्ञा सिंगल मदर आहेत. नॅशनल मीडियामध्ये त्या कायम सक्रीय दिसतात. भारतीय जनता युवा मोर्चाच्या सहाय्याने त्या जास्तीत जास्त नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘2021 हे वर्ष कोविडमुळे अतिशय कठिण गेलं. 2020 आणि 21 या दोन वर्षांमध्ये कमालीचा फरक आहे. अगोदर आम्ही जेवण, अन्न-धान्य आणि वाहतुकीची साधनं लोकांना पुरवत होतो. आता मात्र, नागरिकांना वैद्यकीय सुविधांची आवश्यकता जास्त आहे’, असं चारू सांगतात.

त्या म्हणाल्या, ‘बऱ्याचदा आम्हाला प्लाझ्मा डोनर शोधावे लागतात, औषधांसाठी सप्लायर शोधावे लागतात आणि बेड्सची सोय करण्यासाठी आम्हाला हॉस्पिटलच्या संपर्कात राहावं लागतं. आम्ही मुंबई आणि दिल्लीतील 5 विभागांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.’

दिलीप पांडे, आम आदमी पार्टी

तिमरपूरचे आमदार दिलीप पांडे यांनीही अनेक लोकांची मदत केली आहे. ट्विटरवर रेमडेसिवीर इंजेक्शनची चौकशी करणाऱ्या एका व्यक्तीला त्यांनी तात्काळ आवश्यक ती मदत केली होती. यासोबतच ते दिल्लीमध्ये सॅनिटायझर, अन्नाची पाकिटे यांचंही वाटप करतात. एवढं करुनही ते म्हणतात, की हे खूप मोठं काम नाही. त्यांचे ट्विट्सही सगळे कोविड आणि त्याबाबतच्या मदतीसंबंधीच असतात.

दिल्लीमधील स्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 11 दिवसांमध्ये शहरातील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. अशातच दिल्लीतील नागरिकांना या तीन हिरोंमुळे आशेचा किरण दिसत आहे. अर्थात, या तिघांव्यतिरिक्त समोर न आलेले अजूनही कित्येक लोक इतरांना दिवसरात्र मदत करत आहेतच.

First published:

Tags: Coronavirus, Political leaders