S M L

निर्भयाच्या मारेकऱ्यांपुढे आता उरले फक्त 3 पर्याय !

...तर अखेरचा मार्ग हा राष्ट्रपतींकडे दया याचिका हा असणार आहे.

Sachin Salve | Updated On: May 5, 2017 06:21 PM IST

निर्भयाच्या मारेकऱ्यांपुढे आता उरले फक्त 3 पर्याय !

05 मे : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी सर्व दोषींची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. दोषी मुकेश, विनय, अक्षय आणि पवन यांची याचिका कोर्टाने फेटाळून लावलीये.

परंतु, बचाव पक्षाकडे अजूनही कायदानुसार काही अधिकार आहे. ज्यामुळे कोर्टाच्या या निर्णयाविरोधात ते अपिल करू शकतात. बचाव पक्षाकडे तीन पर्याय उपलब्ध आहे.

1. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरोधात आरोपी फेरविचार याचिका दाखल करू शकतात. फेरविचार याचिकेवर कार्यवाही करणाऱ्या बेंचमध्ये फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या पीठापेक्षा जास्त सदस्य असावे लागणार आहे. तसंच या प्रकारात तीन आणखी न्यायधीशांचा कार्यवाही करणाऱ्या बेंचमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे.


2. जर फेरविचार याचिकेनंतरही फाशीच्या शिक्षेला स्थगिती नाही मिळाली तर बचाव पक्ष क्युरेटिव पिटीशन टाकू शकतो. 2002 मध्ये रूपा अशोक हुरा आणि अशोक हुरा केसमध्ये बचाव पक्षाने ही याचिका दाखल केली होती.

3. वरील दोन्ही प्रकारात दोषींना दिलासा मिळाला नाही तर अखेरचा मार्ग हा राष्ट्रपतींकडे दया याचिका हा असणार आहे. राज्य घटनेच्या अनुच्छेद 72 नुसार राष्ट्रपतींना फाशीची शिक्षा माफ करण्याचा किंवा त्यात फेरफार कऱण्याचा अधिकार आहे.

परंतु, फाशीच्या शिक्षा माफ करण्याचा निर्णय हा राष्ट्रपतींचा वैयक्तिक निर्णय नसतो. यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाचा सल्ला घ्यावा लागतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2017 06:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close