आजपासून या गोष्टी होणार स्वस्त; तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम?
एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होते. यंदा नवीन आर्थिक वर्षात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर 1 एप्रिलपासून जीएसटी परिषदेत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे. सर्वसामान्य, छोटे व्यापाऱ्यांना दिलासा देणार हे वर्ष असणार आहे.

1 एप्रिल 2019 पासून घर खरेदी करणं स्वस्त होणार. जीएसटीच्या नव्या नियमानुसार निर्माणाधिन दुकानांवरील टॅक्स स्लॅब 12 वरुन 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. स्वस्त घरांवरील जीएसटी 8 वरुन 1 टक्के केला आहे. सीमेंट वगळता बाकी वस्तुंवरील जीएसटी स्लॅब कमी केला आहे. घर खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार आहे.

जीवन विमा स्वस्त होणार. जीएसटीच्या नव्या नियमांचं विमा कंपन्यांना पालन करावं लागणार आहे. आतापर्यंत विमा कंपन्या 2006-08 चा डेटा वापरत होते मात्र 1 एप्रिलपासून विमा कंपन्यांना नव्या डेटाचा आधार घ्यावा लागणार आहे. जो 2012-2014 साली तयार करण्यात आला होता.

जर तुम्ही रेल्वेचं तिकीट काढलं असेल आणि तुमची काही कारणांनी ट्रेन चुकली तर तुमचं तिकीट तुम्हाला रिफंड मिळू शकतं. किंवा तुम्ही दुसरं तिकीट काढून दोन पीएनआर एकत्र लिंक करु शकता. दोन तिकीटांसाठी संयुक्त पीएनआर नंबर दिला जाईल. ज्यामध्ये एक ट्रेन सुटली तर दुसऱ्या ट्रेनमधून तुम्ही प्रवास करू शकता.

नोकरी बदलल्यावर आता तुम्हाला ईपीएफओसाठी अर्ज करावा लागणार नाही. तुमचा ईपीएफओ तुमच्या नवीन कंपनीत डायरेक्ट ट्रान्सफर करता येणार
[caption id="attachment_340683" align="aligncenter" width="875"]
1 एप्रिलपासून बँकेतून लोन घेणं स्वस्त होणार आहे. तुम्ही घेतलेल्या कर्जावर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार रेपो रेट लावला जाणार आहे. रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट घटल्यास व्याजदरातही कपात होणार आहे. व्याजदर वाढवणं किंवा कमी करणं आता बँकेच्या हातात राहणार नाही. बँकेच्या व्याजदरांवर रिझर्व्ह बँकेची नजर राहणार आहे.
[/caption]

कार खरेदी करणं महाग होणार आहे. टाटा मोटर्स, रेनॉल्ट इंडिया, जगुआर लैंड रोवर इंडिया (जेएलआर), महिंद्रा एंड महिंद्रा, टोयोटा मोटर्स कार बनवणाऱ्या वस्तुंवरील किंमतीत वाढ करणार आहेत. 1 एप्रिलपासून कारचे पार्ट महाग झाल्यानं कारची किंमत वाढणार आहे. त्यामुळे कार खरेदीत तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.

सीएनजी गॅसच्या किमती 18 टक्क्यांनी वाढल्यामुळे तुमच्या खिसा लवकर रिकामा होऊ शकतो. त्यामुळे पेट्रोल-डिझेलसोबत आता सीएनजी गॅसची किंमतही वाढणार आहे.

1 एप्रिलपासून पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करणाऱ्या सर्व सोसायटी अथवा कॉम्प्लेक्समधील गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.
First Published: Apr 1, 2019 08:37 AM IST