Home /News /national /

विद्यार्थ्यांनी 11 लाख जमा करुन मुंबईतील 174 मजुरांना विमानाने पाठवलं गावी; मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

विद्यार्थ्यांनी 11 लाख जमा करुन मुंबईतील 174 मजुरांना विमानाने पाठवलं गावी; मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना अनेक अडथळे पार करीत आपलं घर गाठावं लागत आहे.

    रांची, 28 मे : कोरोनाच्या संकटात प्रवासी मजुरांसाठी सरकार आणि सामाजिक संघटना पुढे येत आहेत. अशात नॅशनल लॉ स्कूल बंगळुरुच्या माजी विद्यार्थ्यांनी जे केलं ते अत्यंत कौतुकास्पद आहे. लॉ स्कूलच्या या विद्यार्थ्यांनी मुंबईत राहणाऱ्या झारखंडच्या प्रवासी मजुरांसाठी पैसे जमा केले आणि त्यांना विमानाने रांची पोहोचविण्याची व्यवस्था केली. विद्यार्थ्यांनी एकूण 11 लाखांची रक्कम जमा केली आणि 174 मजुरांना गुरुवारी सुरक्षितपणे रांचीला पोहोचवले. नॅशनल लॉ स्कूलच्या या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं जात आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करीत याबाबत माहिती दिली. या विद्यार्थ्यांच्या पुढाकारामुळे 174 मजूर सुखरुप गावी पोहोचले आहेत. नॅशनल लॉ स्कूलच्या वर्ष 2000 च्या बॅचचे विद्यार्थी शैल त्रेहान यांनी टाइम्स ऑफ इंडियासोबत केलेल्या बातचीतमध्ये सांगितले की, ते व त्यांच्यासोबतचे सहकाऱ्यांनी मजुरांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. यादरम्यान स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वत:चे पैसे जमा करुन प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवले. शैल त्रेहान यांनी सांगितले की पहिल्यांदा एक बस भाड्याने घेतली आणि मजुरांना पाठविण्याचा प्लान केला. मात्र जेव्हा हिशोब लावून पाहिला तेव्हा लक्षात आले की इतक्या पैशात तर मजुरांना विमानाने पाठविता येऊ शकतं. टाटा समूहच्या मदतीने आम्ही हे काम पूर्ण केले. यानंतर आम्ही क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून एकूण 11 लाख रुपये जमा केले. ज्यातून एअर एशियाच्या फ्लाईटची सोय करण्यात आली.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या