Home /News /national /

या पर्यायांनी होऊ शकते दारुची होम डिलिव्हरी; मद्य निर्माते आणि रेस्टॉरंट मालकांची सरकारला विनंती

या पर्यायांनी होऊ शकते दारुची होम डिलिव्हरी; मद्य निर्माते आणि रेस्टॉरंट मालकांची सरकारला विनंती

कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये सुमारे 3000 कोटी रुपयांचा मद्यसाठा उपलब्ध आहे.

    नवी दिल्ली, 11 मे : मद्य निर्मित्यांसह आता रेस्टॉरंट्स यांनी सरकारकडे मद्याची होम डिलिव्हरी देण्याची परवानगी मागितली आहे. होम डिलिव्हरीमुळे कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्याच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल, तसेच या बंदीमुळे ठप्प पडलेला व्यवसायही पुन्हा उभा राहिल, असे या कंपन्यांचे म्हणणे आहे. बिअर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची संघटना ऑल इंडिया ब्रेवर्स असोसिएशनने या संदर्भात फ्लिपकार्ट, एमेझॉन यासोबतच स्विगी, झोमॅटो सारख्या खाद्यपदार्थांची डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्यांना विशेष परवाने देण्याची सूचनाही केली आहे. या कंपन्या ऑनलाईन ऑर्डर घेऊन परवानाधारक मद्यविक्रेत्यांकडून मद्य घरोघरी पोहोचवू शकतील. राज्यातील उत्पादन शुल्क विभागानेही ऑनलाॅईन ऑर्डर घेण्यासाठी पोर्टल तयार करावा, अशी मागणीही या संघटनेने केली आहे. कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये सुमारे 3000 कोटी रुपयांचा मद्यसाठा उपलब्ध आहे. हा साठा संपविण्यासाठी होम डिलिव्हरीची परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारांकडे करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय रेस्टॉरंट संघाचे अध्यक्ष अनुराग कटरियार यांच्या म्हणण्यानुसार ‘ या काळात आम्ही मोठ्या संकटाचा सामना करीत आहोत. एकीकडे आमच्याकडे महाग मद्याचा साठा झाला आहे, तर दुसरीकडे आमच्यासमोर रोखीचे संकट आहे. काही राज्यांनी मद्यविक्रीला परवानगी दिल्यामुळे आता थोडा आशेचा किरण दिसत आहे. आमच्याजवळ असलेला साठा ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून विकण्यास परवानगी मिळावी, अशी आमची सर्व राज्य सरकारांना विनंती आहे.’ यामुळे रेस्टाॅरंटकडे असेलला मद्याचा साठा संपण्यास मदत होईल तसेच यामुळे मिळालेल्या पैशांतून व्यवसायाला आधार मिळेल. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.  ऑनलाईन मद्यविक्रीमुळे सोशल डिस्टन्सिंगचेही योग्य रितीने पालन करता येईल, असा त्यांचा दावा आहे. यासाठी काही कायद्यात बदल करावे लागतील, याची कल्पना असली तरी सद्यस्थिती पाहता हे पाऊल उचलावे लागेल. खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्याही यासाठी तयार असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार याबाबत काही कंपन्यांसोबत बोलणेही सुरु असल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टानेही नुकत्याच दिलेल्या एका आदेशात होम डिलिव्हरी आणि ऑनलाईन विक्रीवर राज्य सरकारांनी विचार करावा, असे म्हटले होते. यामुळे कोराना विषाणूचा संसर्गही आटोक्यात येण्यास मदत मिळणार आहे. संबंधित-पाकिस्तानात महिलांकडून ब्लॅकमेलिंग; पुरुष झाले पीडित
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या