या मुस्लीम देशाच्या नोटेवर का आहे गणपतीचा फोटो?

या मुस्लीम देशाच्या नोटेवर का आहे गणपतीचा फोटो?

87 टक्के मुस्लीम संख्या असलेल्या देशाच्या चलनी नोटेवर गणपतीचा फोटो आहे.

  • Share this:

मुंबई, 10 मे : हिंदु - मुस्लीम वाद काही नवा नाही. अनेकवेळा आपल्या देशात त्यावरून दंगे देखील झालेले आहेत. पण, जगात असा देश आहे ज्याच्या चलनी नोटेवर गणपतीचा फोटो आहे. विश्वास नाही ना बसत? पण हे सत्य आहे. सर्वाधिक मुस्लिम संख्या असलेल्या देशात हिंदुचा देव असलेल्या गणपतीचा फोटो कसा? आणि का? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का? शिवाय तो देश कोणता हे प्रश्न तुमच्या मनात नक्की आले असतील.

तर, इंडोनेशिया असं या देशाचं नाव आहे. या देशात मुस्लिमांची संख्या ही 87.5 टक्के असून हिंदू केवळ 3 टक्के आहेत.

नोटेवर गणपतीचा फोटो का?

नोटेवर गणपतीचा फोटो का? या बद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल नाही का? भारताप्रमाणे इंडोनेशियामध्ये देखील रूपया हे चलन आहे. इंडोनेशियातील 20 हजाराच्या नोटेवर गणपतीचा फोटो आहे. या ठिकाणी गणपती हा शिक्षण, कला आणि विज्ञानाची देवता म्हणून मानला जातो.

इंडोनेशियातील 20 हजाराच्या नोटेवर गणपती तर मागे वर्गाचा फोटो आहे. वर्गाच्या फोटोमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी देखील दिसत आहेत. शिवाय, इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचा देखील फोटो आहे. देवांत्रा हे स्वातंत्र्यासंग्रमात देखील अग्रेसर होते.

बडव्यांची बंडखोरी.. बडवे समाजाने पंढरपुरात उभारले स्वतंत्र विठ्ठल मंदिर

आणखी काय आहे कारण

काही वर्षांपूर्वी इंडोनेशियामध्ये अर्थव्यवस्था बडघाईला आली होती. त्यावेळी विचारविमर्श करून अर्थतज्ज्ञांनी 20 हजाराची नोट जारी केली. त्यावर गणपतीचा फोटो होता. त्यामुळेच अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचं इथल्या लोकांचं म्हणणं आहे.

अर्जुन, श्रीकृष्णाची देखील मूर्ती

इंडोनेशियामध्ये केवळ नोटेवर गणपतीचाच फोटो नाही तर, इंडोनेशियाच्या मॅस्कोटवर हनुमान आहे. शिवाय, फेसम टुरिझम टेस्टिनेशनवर अर्जुन आणि श्रीकृष्णाची मूर्ती लावण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बातमी, पंढरपूरमध्ये उभारलं विठ्ठलाचं स्वतंत्र मंदिर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Indonesia
First Published: May 10, 2019 08:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading