या 5 स्त्रियांच्या खटल्यावर न्यायालयानं घेतला तलाक बंदीचा ऐतिहासिक निर्णय

या 5 स्त्रियांच्या खटल्यावर न्यायालयानं घेतला तलाक बंदीचा ऐतिहासिक निर्णय

तिहेरी तलाकवर सुप्रीम कोर्टानं बंदी घातलीय. त्याला कारण ठरल्यात पाच महिला. देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या स्त्रियांनी या तीन तलाकाविरोधात कोर्टात धाव घेतली. कोण आहेत या महिला?

  • Share this:

22 आॅगस्ट : तिहेरी तलाकवर सुप्रीम कोर्टानं बंदी घातलीय. त्याला कारण ठरल्यात पाच महिला.  देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या स्त्रियांनी या तीन तलाकाविरोधात कोर्टात धाव घेतली. कोण आहेत या महिला? या आहेत उत्तराखण्डच्या सायरा बानो, राजस्थानच्या आफरीन रहमान, पश्चिम बंगालच्या इशरत जहां आणि उत्तर प्रदेशच्या आतिया साबरी आणि गुलशन परवीन.

सायरा बानो

सायरा उत्तराखंडाच्या काशीपूर इथे राहते. सायरानं मुस्लिम समाजातला तीन तलाक, निकाह हलाला आणि अनेक लग्न या प्रथांविरोधात न्यायालयात धाव घेतलीय. त्यांनी मुस्लीम पर्सनल लाॅ अॅप्लिकेशन कायदा 1936 कलम 2च्या संविधानालाच आव्हान दिलंय.

गुलशन परवीन

उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये राहणाऱ्या गुलशन यांचा पती नोएडामध्ये नोकरी करतो. एक दिवस त्यानं दहा रुपयांच्या स्टँप पेपरवर तलाकनामा पाठवला. लग्नानंतर तीन वर्षांनी त्यानं गुलशनला तलाकनामा पाठवला. गुलशनला दोन वर्षांचा मुलगा आहे.

आतिया साबरी

उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये राहणाऱ्या आतियाच्या पतीनं 2016मध्ये एका कागदावर तीन तलाक असं लिहून पत्नीसोबतचं नातं तोडलं होतं. 2012मध्ये दोघांचं लग्न झालं. त्यांना दोन मुली आहेत. आतियाचा असा आरोप आहे की दोन मुली झाल्या म्हणून तिचा पती आणि सासरचे नाराज आहेत. ते तिला घराबाहेर काढणार होते. तिला विष टाकून मारण्याचा प्रयत्नही झाला.

इशरत जहाँ

पश्चिम बंगालच्या हावडामध्ये राहणाऱ्या इशरतला तिच्या पतीनं दुबईहून फोन करून फोनवर तलाक दिला. एवढंच नाही तर तिची चार मुलंही तिच्यापासून काढूनन घेतली. तिच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं. या तीन तलाकाविरोधात तिनं कोर्टाकडे धाव घेतलीय.

आफरीन रहमान

जयपूरच्या आफरीनला तिच्या पतीनं स्पीड पोस्टानं तलाक दिला. दोघांचं लग्न एका आॅनलाईन वेबसाईटवरून झालेलं. आफरीननं तीन तलाक बंद करून महिलांना न्याय देण्याची मागणी केलीय.

First published: August 22, 2017, 2:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading