ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे देणार राजीनामा, घोषणा करताना का झाल्या भावूक?

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे देणार राजीनामा, घोषणा करताना का झाल्या भावूक?

भारतात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. नरेंद्र मोदी लवकरच पंतप्रधानपदाची शपथ घेतील पण ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

  • Share this:

लंडन, 24 मे : भारतात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. नरेंद्र मोदी लवकरच पंतप्रधानपदाची शपथ घेतील पण ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. थेरेसा मे 7 जूनला राजीनामा देणार आहेत.

ब्रेक्झिटबद्दल पराभव

ब्रेक्झिटच्या मुद्द्यावर वारंवार पराभव झाल्यामुळे थेरेसा मे यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.सत्ताधारी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या म्हणून जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देत आहे, असं थेरेसा मे यांनी म्हटलं आहे.

जोपर्यंत ब्रिटनच्या पुढच्या पंतप्रधानांचं नाव ठरत नाही तोपर्यंत आपण पदावर राहू, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.डोळ्यात तरळले अश्रू

राजीनाम्याची घोषणा करताना थेरेसा मे अत्यंत भावूक झाल्या होत्या. ब्रिटनचं पंतप्रधानपद भूषवणं हा माझ्यासाठी सन्मानच होता. मी ज्या देशावर प्रेम करते त्या देशासाठी काम करण्याची मला संधी मिळाली, असं त्या म्हणाल्या. हे सांगताना थेरेसा मे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

मार्गारेट थॅचर यांच्यानंतर ब्रिटनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान होण्याचा मान मला मिळाला, असंही थेरेसा मे यांनी म्हटलं.

अनेक वाटाघाटी

ब्रेक्झिटच्या ठरावांवर अनेक वेळा वाटाघाटी झाल्या. ब्रेक्झिट करार रद्द करण्यासाठी मी लोकप्रतिनिधींची मनं वळवण्याचा खूप प्रयत्न केला पण मला यात यश आलं नाही, याचं दु:ख वाटतं, असं थेरेसा मे म्हणाल्या.

ब्रेक्झिट करारानुसार ब्रिटनने युरोपियन युनियनमधूनबाहेर पडण्याची मुदत 29 मार्चलाच संपली होती. पण थेरेसा मे यांनी यासाठी वाढीव मुदत मागून घेतली होती.

================================================================================

VIDEO : चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंना भेटले, सांगितलं 'हे' पराभवाचं कारण!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 06:05 PM IST

ताज्या बातम्या