नवी दिल्ली, 5 सप्टेंबर : देशभरात कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या कहरात नोकरभरती रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यावर अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) महासाथीमुळे उत्पन्न आर्थिक संकटात (Economic Crisis) सरकारी खर्चांवर नियंत्रण आणण्यासाठी शुक्रवारी जारी केलेल्या महसूल विभागाने (Department of expenditure) सरकारी नोकरभरती (Government jobs) वर कोणताही परिणाम होणार नाही. अर्थ मंत्रालयाकडून जारी केलेल्या स्पष्टीकरणात सांगण्यात आले आहे की, सरकारी एजंसी उदा. एसएससी, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डात पहिल्यांप्रमाणे भरती जारी राहिल. अर्थ मंत्रालयाने एक नोटिफिकेशन जारी करीत हे स्पष्ट केले आहे की, भारत सरकारमध्ये रिकाम्या पदांच्या भरीतासाठी कोण्याताही नव्या भर्तीवर निर्बंध आणण्यात येणार नाहीत.
CLARIFICATION:
There is no restriction or ban on filling up of posts in Govt of India . Normal recruitments through govt agencies like Staff Selection Commission, UPSC, Rlwy Recruitment Board, etc will continue as usual without any curbs. (1/2) pic.twitter.com/paQfrNzVo5
मंत्रालयाने स्पष्ट केलं की, 1 जुलै 2020 नंतर जर कोणतं नवीन पद तयार केलं गेलं आहे ज्यासाठी महसूल विभागाची मंजुरी घेण्यात आलेली नाही आणि यावर जर नियुक्ती झालेली नाही तर हे पद रिक्त ठेवण्यात येईल. मंत्रालयाकडून हेदेखील सांगण्यात आले आहे की, महसूल विभागाचे जे सर्क्युलर आहे ते पदांच्या निर्मितीच्या अंतर्गत प्रक्रियेशी संबंधित आहे आणि हे कोणत्याही प्रकारे भर्तीवर परिणाम होऊ देणार नाही.