शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा नाहीच, आंदोलक ठाम राहिल्याने सरकारची चिंता वाढली

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा नाहीच, आंदोलक ठाम राहिल्याने सरकारची चिंता वाढली

दिल्लीतल्या विज्ञान भवनात 35 शेतकरी संघटना आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये ही चर्चा झाली. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पीयुष गोयल यांनी शंकांना उत्तरं दिलीत.

  • Share this:

नवी दिल्ली 03 डिसेंबर: विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांमध्ये झालेली आजही चर्चाही निष्फळ ठरली आहे. दिवसभर चाललेल्या चर्चेत गाडी फार पुढे जावू शकली नाही. सरकार आपल्या भूमिकेवर तर शेतकरी संघटना या त्यांच्या भूमिकेवर ठाम होत्या त्यामुळे तोडगा निघू शकला नाही. आता पुढची चर्चा ही 5 डिसेंबरला होणार आहे. नवे कायदे रद्द करा (Farm Law 2020)अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तर त्यावर माघार घ्यायला सरकारची तयारी नाही. MSPची तरतूद ही कायद्याने व्हावी अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे. शेतकरी आंदोलनाचा 8वा दिवस असून सरकारची चिंता वाढली आहे.

दिल्लीतल्या विज्ञान भवनात 35 शेतकरी संघटना आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये ही चर्चा झाली. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पीयुष गोयल यांनी शंकांना उत्तरं दिलीत.

MSPच्या मुद्यावर सरकारची भूमिका सकारात्मक वाटली त्यात थोडी प्रगती झाली असं भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. तर सरकार सर्व प्रश्नांवर चर्चेला तयार असून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं. मात्र आंदोलक तोडगा निघाल्याशीवाय मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली असून शेतकऱ्यांचं समाधान करण्यासाठी सरकारी पातळीवरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

दरम्सयान, सरकार विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत काही वर्षांपूर्वी पुरस्कार परत करण्याची मोहिम सुरू झाली होती. आता केंद्राच्या शेतकरी धोरणाविरोधात आंदोलन सुरू आहे. त्याच्या समर्थनासाठी पुरस्कार परत करण्याची मोहिम सुरू झाली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल (Former Punjab CM Parkash Singh Badal ) यांनी पद्म विभूषण (Padma Vibhushan) पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. अकाली दलाचे नेते  सुखदेव सिंह ढींढसा (Sukhdev Singh Dhindsa) यांनीही आपला पद्म भूषण (Padma Bhushan) पुरस्कार परत करण्याची घोषणा केलीय.

प्रकाश सिंह बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीन पानांचं पत्र लिहून आपला विरोध व्यक्त केलाय. ते म्हणाले, मी गरीब असल्यामुळे पुरस्कारापलिकडे परत करण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. सरकारने शेतकऱ्यांसोबत विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांचा अपमान होत असताना मी शांत राहू शकत नाही. त्यामुळे मी हा पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी कळवलं आहे.

मी जो काही आहे तो शेतकऱ्यांमुळे आहे. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या कृषी विधेयकाविरोधात अकाली दलाच्या मंत्र्यांनी मोदी सरकारमधून राजिनामा देत NDAमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 3, 2020, 8:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या