'भारतात बुरखा बंदी करा', उद्धव ठाकरेंच्या मागणीला रामदास आठवलेंचा विरोध

'भारतात बुरखा बंदी करा', उद्धव ठाकरेंच्या मागणीला रामदास आठवलेंचा विरोध

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतात बुरख्यावर बंदी आणण्याच्या मागणीला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला आहे.

  • Share this:

मुंबई, 1 मे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतात बुरख्यावर बंदी आणण्याच्या मागणीला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी विरोध दर्शवला आहे. देशात 'बुरखा' तसेच 'नकाब'वर बंदी आणू नये, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंच्या मागणीला रामदास आठवलेंचा विरोध

'बुरखा घालणाऱ्या सर्वच महिला दहशतवादी नसतात. ज्या महिला दहशतवादी आहेत, त्यांचा बुरखा हटवण्यात आला पाहिजे. पण बुरखा परिधान करणं ही एक परंपरा आहे आणि हा त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे देशात बुरख्यावर बंदी आणली जाऊ नये',असं म्हणत रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंच्या मागणीला विरोध दर्शवला आहे.

हिंदुस्थानातही 'बुरखा' तसेच 'नकाब' बंदी करावी, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. उद्धव यांनी सामना संपादकीयद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे याबाबतची मागणी केली आहे. ''फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न'', अशी विचारणा त्यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे.

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे

- भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे.

- राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी जाहीर केले. आम्ही या निर्णयाचे स्वागत करीत आहोत व पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी राष्ट्रहितासाठी करीत आहोत.

- बुरख्यांचा वापर करून देशद्रोह, दहशतवाद घडवला जात असल्याची उदाहरणे समोर आली.

धर्मांधता व त्यांच्यातील रूढी, परंपरा राष्ट्रीय सुरक्षेच्या आड येत असतील तर त्या मोडून काढल्या पाहिजेत. मोदी यांनी हे सर्व करून घेतले पाहिजे. सर्जिकल स्ट्राइकइतकेच हे कार्य धाडसाचे आहे.

वाचा अन्य बातम्या

महाराष्ट्रादिनीच माओवाद्यांकडून जळीतकांड, 5 कोटींपेक्षा जास्त मालमत्तेचं नुकसान

बारामती जिंकण्याच्या भाजपच्या दाव्यानंतर शरद पवारांचं धक्कादायक विधान

SPECIAL REPORT : 'प' पवारांचा आणि 'प' पंतप्रधानांचा, हे गणित जुळणार?

First published: May 1, 2019, 9:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading