शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही - राहुल गांधी

शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही - राहुल गांधी

  • Share this:

दिल्ली, 3 ऑगस्ट : काँग्रेस अध्यक्ष राहूल यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या म्हणजे युती होत नाही. शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेना आणि कांग्रेसची विचारधारा वेगळी आहे. आमच्या सोबत राष्ट्रवादी आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशात बसप-सपा आणि काँग्रेस सोबत लढणार असून, मोदींना हरवणं हेच आमचं प्रमुख लक्ष्य आहे. २०१४ नंतर लोकांना असं वाटत होतं की, मोदींना हरवता येत नाही. पण आता हवा बदलतेय, आणि हे लोकांना देखी आता पटलयं असे ते म्हणाले. आगामी निवडणुकांना लक्षात घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले की, पप्पू कोण आहे हे आता सगळ्यांना कळलंय. युपी-बिहार-महाराष्ट्रात भाजपच्या 120 जागा कमी होतील असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला. - ते (मोदी) हँडिकॅप आहेत... त्यांच्याकडे कुठलीच पॉलिसी नाहीये. 7 किंवा 8 तारखेला काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक दिल्लीत बोलावण्यात आलीये.. मराठा आरक्षणासह अनेक विषयांवर राहुल गांधी नेत्यांशी संवाद साधतील. काँग्रेसचे आमदार, महत्वाचे नेते उपस्थित असतील. या बैठकीमुळे मुंबई अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना उत आला होता.

प्रधानमंत्री मोदी यांची इंदिरा गांधी यांच्याशी अजीबात तुलना होऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं. ''मोदी पीएम तेव्हाच बनतील जेव्हा त्यांच्या 230 पैकी 240 सीट येतील. पण, यूपी बिहार महाराष्ट्र मध्ये आम्हालाच जास्त जागा मिळतील असा विश्र्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या म्हणजे युती होत नाही. शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेना आणि कांग्रेसची विचारधारा वेगळी आहे. महाराष्ट्रात आमच्या सोबत राष्ट्रवादी असल्याचे ते म्हणाले.

जळगावात ओवेसींची एंट्री, एमआयएमने जिंकल्या 3 जागा

मराठा आंदोलनाच्या आगीतही सांगली आणि जळगावात कमळ उमललं !

Jalgaon Election 2018: उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन भाजपचे 'किंग', खडसे पडद्याआड !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2018 07:40 PM IST

ताज्या बातम्या