नवी दिल्ली, 22 मार्च : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी लिहिलेल्या पत्राची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिरफाड केली आहे. 'परमबीर सिंग यांनी दावा केल्याप्रमाणे सचिन वाझे (Sachin Vaze) आणि अनिल देशमुख यांची भेट न झाल्याचे पुरावे माझ्याकडे आहे', असं शरद पवारांनी (Sharad Pawar) स्पष्टपणे सांगत अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली.
शरद पवार यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी शरद पवार यांनी परमबीर सिंग यांच्या पत्रावर नव्याने भूमिका मांडली
'अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरू आहे. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांचे जे पत्र लिहिले होते. त्यामुळे सचिन वाझेंना भेटायला बोलावलं असा दावा करण्यात आला आहे. पण त्या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीला देशमुख हे रुग्णालयात दाखल होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत. त्यानंतर 27 फेब्रुवारीपर्यंत ते क्वारंटाइन होते. त्याच दिवशी ते वाझे यांना भेटले असल्याचा दावा करण्यात आला होता. जेव्हा चौकशी होईल तेव्हा सत्य बाहेर येईल, असं पवार स्पष्ट केले.
रमझानमध्ये कोरोना लस घेतल्यास तुटणार रोजा? सौदीतील ग्रँड मुफ्तींनी दिलं उत्तर
'जे ही आरोप झाले त्यामध्ये मुख्य प्रकरण काय आहे. कोणाच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्यात आले हे प्रकरण आहे. माजी पोलीस आयुक्ताला हे सर्व माहीत होते तर एक महिने का शांत होते, असा सवाल पवारांनी केली.
Goa Municipal Election 2021:काँग्रेसकडून भाजपला धोबीपछाड,मुख्यमंत्र्यांना धक्का
मायकल रोडवर स्फोटकं कुणी ठेवली, मनसुख हिरेन यांची हत्या कुणी केली, याचा तपास झाला पाहिजे. या सर्व चौकशीला विचलित करण्यासाठी हे सर्व प्रकार विरोधक करीत आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.
'अनिल देशमुख यांच्या प्रकारातील सर्व पुरावे माझ्याकडे आले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या प्रश्न उपस्थित होत नाही. मुख्यमंत्री समोर सर्व पुरावे आले असेल मला वाटते. चौकशीचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचे आहे, असं पवारांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, BJP, India, Paramvir sing, Sachin vaze, Sharad pawar, अनिल देशमुख, शरद पवार