निवडणुकीत बाहेर येईल लोकांच्या मनातला मोदी सरकारबद्दलचा राग - प्रियंका गांधी

निवडणुकीत बाहेर येईल लोकांच्या मनातला मोदी सरकारबद्दलचा राग - प्रियंका गांधी

सपा आणि बसपाने काँग्रेसला आपल्या आघाडीत घेतलेलं नाही त्यामुळे काँग्रेसलाही फटका बसण्याची शक्यता आहे.

  • Share this:

साहरनपूर (उत्तर प्रदेश), 9 एप्रिल : लोकांच्या मनात नरेंद्र मोदी यांच्या सरकारबद्दल प्रचंड राग असून लोकसभा निवडणुकीत तो दिसून येईल असं मत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी व्यक्त केलं. हा राग असल्यानेच त्याचा भाजपला फटका बसणार असून काँग्रेसला लोक पुन्हा निवडुन देतील असंही त्या म्हणाल्या.

प्रियंका गांधी या सध्या उत्तरप्रदेशात झंझावती प्रचार दौऱ्यावर आहेत. त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशातल्या जागांची जबाबदारी आहे. या सर्व ठिकाणी काँग्रेसला चांगलं यश मिळेल असं त्या म्हणाल्या. उत्तर प्रदेशात तिरंगी लढत होत आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडी झाल्याने भाजपला मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे.

या दोनही पक्षांनी काँग्रेसला आपल्या आघाडीत घेतलेलं नाही त्यामुळे काँग्रेसलाही फटका बसण्याची शक्यता आहे.

प्रियंका गांधी मुंबई गाजविणार

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी एप्रिलच्या तिस-या आठवड्यात मुंबईत प्रचार करण्यासाठी येणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी त्या मुंबईत रोड शो करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

पण प्रियांका गांधी यांच्या रोड शोवरून काँग्रेस नेत्यांमधे रस्सीखेच सुरू झाली आहे. संजय निरुपम यांचा त्यांच्या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून ते उर्मिला मातोंडकर यांच्या उत्तर मुंबईपर्यंत प्रियांकाच्या रोड शो साठी आग्रही आहेत. तर प्रियांकांनी दक्षिण मुंबईत रोड शो करावा यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता प्रियांका गांधी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

First Published: Apr 9, 2019 07:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading