'बॉक्सिंग येते सध्या बकवास शिकतोय', विजेंदर आणि परेश रावलमध्ये ऑनलाइन जुंपली!

'बॉक्सिंग येते सध्या बकवास शिकतोय', विजेंदर आणि परेश रावलमध्ये ऑनलाइन जुंपली!

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : चित्रपट क्षेत्रातील आघाडीचे कलावंत आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल आपल्या आभिनयासाठी लोकप्रिय आहेत. अभिनय क्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्यांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला. बॉक्सर विजेंद्रसिंगने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये करिअर सुरु केलं आहे. दोघेही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. पण सध्या या दोघांमध्ये दोन बॉक्सरमध्ये सुरु असावा असा व्टिटरचा सामना सुरु आहे. बॉक्सर जसे एखाद्या सामन्यात समोरच्या बॉक्सरच्या प्रत्येक बुक्याला तेवढ्याच जोरदार उत्तर देतो, त्याच पद्धतीने सध्या विजेंदर सिंह आणि परेश रावल यांच्यात ट्विटला ट्विट ने उत्तर देणं सुरु आहे.

कशी झाली सुरुवात?

दिल्लीमध्ये गेले काही दिवस वातावरण चांगलंत तणावाचं होतं. दंगलसदृष्य स्थितीमुळे संपूर्ण दिल्ली दहशतीखाली होती. त्याच वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर होते. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या तणावाच्या स्थितीकडे दुर्लक्ष केलं. तसंच या दरम्यान सोशल मिडीयात मोदी आणि शहा यांच्यावर जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचाही आरोप झाला. झाल्या प्रकारने हैराण झालेल्या बॉक्सर विजेंदर सिंह ने ट्विटरवरून मोदी आणि शहा यांच्यावर अतीशय जोरदार टीका केली.

विजेंदरसिंह च्या ट्विटवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या. काही जणांनी विजेंदर ट्रोल केलं तर काही जणांनी त्याच्या धाडसाचं कोतुक केलं. पण या ट्विटमुळे सगळ्यात जास्त राग आला तो चित्रपट अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल यांना. परेश रावल यांनी विजेंदर सिंहला बॉक्सिंगवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. इतकंच नाही तर बॉक्सिंगच खेळ बकवास करू नकोस असंही बजावलं. यावर सुद्धा विजेंदर चे समर्थक आणि विरोधक तसंच परेश रावल यांच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये ट्विटर वॉर सुरु झालं.

ट्विटरवर यावरून सुद्धा घमासान सुरु झालं. विजेंदरसिंह आणि परेश रावल यांच्या ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत होता. विरोधकाने दिलेल्या ठोशाला ठोश्याने उत्तर दिलं नाही तर तो बॉक्सर कसला. परेश रावल यांच्या ट्विटला पुन्हा विजेंदरने जोरदार ठोसा लगावला म्हणजे तितकंच जोरजार प्रत्योत्तर दिलं. विजेंदरने पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांवर. विजेंदरने जे उत्तर दिलं त्यावरून एक बॉक्सर म्हणून विजेंदर किती आक्रमक आहे यचा पुन्हा एखदा प्रत्यय आला. कारण आता उत्तर देतांना विजेंदरने, 'एक ही मारा लेकीन सॉलिड मारा' अशा पद्धतीचं उत्तर अभिनेते परेश रावल यांना दिलं आहे.

सध्या तरी ट्विटरवरची ही बॉक्सिंगची मॅच थांबली असली तरी ती पुन्हा सुरु होऊ शकते यात शंकाच नाही. कारण बेल वाजेपर्यंत बॉक्सर मॅच सोडत नाही. तर 'कट..' म्हणेपर्यंत अभिनेता सीन देतांना मधे थांबत नाही. अर्थात चित्रपट आणि मॅचमध्ये प्रेक्षक मात्र दोन्हीची मजा घेत असतात जे सध्या इथेही सुरु आहे.

अन्य बातम्या

अमृता खानविलकरचा स्टंट पाहून आईनं लावला डोक्याला हात, हा VIDEO एकदा पाहाच

गटारात पडलेल्या भाज्या विकत होता विक्रेता, किळसवाणा VIDEO व्हायरल

First published: February 28, 2020, 10:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading