कुरिअर ट्रॅकिंगचा SMS आला असेल तर व्हा सावध! नाही तर पैसे होतील गायब

कुरिअर ट्रॅकिंगचा SMS आला असेल तर व्हा सावध! नाही तर पैसे होतील गायब

सध्या देशभरात ऑनलाईन फसणुकीच्या संख्येत मोठी वाढ होतेय. फसवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय शोधले जाताहेत. आता तर कुरिअर ट्रॅकिंगचा संदेश पाठवून लोकांना गंडा घातला जात असल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जानेवारी: ऑनलाईन व्यवहारामुळं लोकांचा वेळ आणि पैसा वाचला आहे. मात्र चटकन व्यवहार होण्याच्या नादात ग्राहक सुरक्षेकडे दुर्लक्ष करतोय. त्यामुळं काही सेकंदात लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. त्यातच आता फ्रॉड करणारे फ्रॉड करण्यासाठी नवीन मार्ग शोधताहेत. वस्तूच्या ट्रॅकिंगचा संदेश पाठवून ग्राहकांची फसणूक होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.  त्यामुळं प्रसिद्ध कुरिअर कंपनी फेड एक्सनं सोशल मीडियावर त्यांच्या ग्राहकांसाठी ट्वीट करून अशा फ्रॉड SMS पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तुम्हाला कंपनीकडून कोणत्याही वस्तूच्या ट्रॅकिंगचा संदेश आला असेल तर सावध राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

कशी होते ग्राहकांची फसवणूक?

सध्या हॅकर्स ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधताहेत. लोकांची फसवणूक करण्यासाठी हॅकर्स लोकांच्या मोबाईलवर संदेश पाठवतात. तुम्ही ऑर्डर केलेल्या वस्तूच्या ट्रॅकिंगसाठीचा बनावट संदेश संबंधीत हॅकर्स तुमच्या मोबाईलवर पाठवतो. तसा मेलही तुम्हाला केला जातो. तुम्ही तो संदेश पाहिल्यानंतर एखाद्या प्रसिद्ध कंपनीनं पाठवलेल्या संदेशासारखाच हा संदेश तुम्हाला वाटतो. संदेश ज्या व्यक्तीला पाठवला जातो त्या व्यक्तीचं नाव त्या संदेशात असतं. त्यामुळं त्या संदेशाविषयी कुणालाही शंका येत नाही.

SMS आणि ईमेलमध्ये काय असते?

बनावट संदेशात कुरिअर कंपनीकडून नावासह कुरिअर ट्रॅकिंग कोड सुद्ध असतो. डिलेवरीचा वेळ आणि ट्रॅकिंगची वेळ निश्चित करण्यासाठी संदेशात हॅकर्सकडून एक लिंक देण्यात येते. त्या लिंकवर क्लिक करण्यासाठी सांगण्यात येतं. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर यूजरची माहिती त्या वेबसाईटवर जाते. त्यानंतर ती वेबसाईट युजर्सची खासगी आणि बँकेची माहिती मागते. जर ग्राहकांकडून तशी माहिती त्या वेबसाईडला दिली गेली तर  लाखो रुपयांनी फसवणूक होते. त्यामुळं तुम्हाला असा संदेश आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा.

कसे फसतात ग्राहक ?

काही ग्राहक कसलाही विचार न करता आपली खासगी माहिती संबंधीत वेबसाईडला देतात. खासगी माहिती संबंधीत वेबसाईडला मिळाल्यानंतर तुमच्या खात्यातील पैसे गायब करण्याचा प्रयत्न केला जातो. बहुतेक वेळा तर ग्राहकांची मोठी फसणूक होते. काही क्षणात लाखो रुपये तुमच्या बँक अकाऊंडमधून गायब होतात. हॅकिंगचा हा प्रकार फिशिंग हल्ल्या सारखाच असतो. फिशिंग हा अकाऊंट हॅकिंगचा सर्वात जूना आणि चांगला प्रकार आहे. फिशिंगमध्ये कोणत्याही प्रसिद्ध वेबसाईडचं नकली व्हर्जन तयार करून हॅकर्स युजर्सचा पासवर्ड आणि इतर बँकिंगची सर्व माहिती मिळवतो.

कूरिअर कंपनीचा ग्राहकांना इशारा

सध्या देशात अनेक फेक संदेश पाठवून ग्राहकांची मोठी फसणवणूक होता आहे. त्यामुळं कुरिअर ट्रॅकिंगचा संदेश पाठवूनही लोकांची मोठी फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं अशा बनावट संदेशापासून सावध राहण्याचा इशारा फेड एक्स कुरिअर कंपनीनं दिला आहे. कुरिअर कंपनी ग्राहकांना संदेश पाठवून खासगी माहिती आणि बँकेची माहिती मागवत नाही. त्यामुळं तुम्हाला असं संदेश आले असल तर ते न उघडता डिलीट करण्याच्या सुचना कुरिअर कंपनीनं ग्राहकांना दिल्या आहेत. तसे संदेश तुम्हाला आले असेल तर abuse@fedex.com या मेल आयडीवर माहिती देण्याच्या सुचना कंपनीनं ग्राहकांना दिल्या आहेत.

First published: January 24, 2020, 3:17 PM IST

ताज्या बातम्या