मराठी बातम्या /बातम्या /देश /

देशातील हे राज्य झालं लॉकडाऊन फ्री; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

देशातील हे राज्य झालं लॉकडाऊन फ्री; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

अनेक देशांना या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. आणि दोन ते तीन महिन्यांहून अधिक काळापर्यंत देशात लॉकडाऊन लागू केला. मात्र याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला.

अनेक देशांना या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी लॉकडाऊन लागू केला. आणि दोन ते तीन महिन्यांहून अधिक काळापर्यंत देशात लॉकडाऊन लागू केला. मात्र याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाला.

कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नसल्याचे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे

  • Published by:  Meenal Gangurde

बंगळुरु, 21 जुलै : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. विविध राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी काही भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी उद्यापासून राज्यात लॉकडाऊन लागू नसल्याची घोषणा केली आहे. आता कर्नाटक हे लॉकडाऊन फ्री राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी सांगितले की - आता लोकांनी कामावर परतण्याची गरज आहे. राज्याची अर्थव्यवथाही महत्त्वाची आहे. अर्थव्यवस्था स्थिर ठेवत आपल्याला कोरोनाशी लढायचं आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही, यापुढे कन्टेन्मेंट झोनमध्ये प्रतिबंध असतील.

First published:

Tags: Corona virus in india