कर्ज घेऊन फरार झाला तरुण; 17 दिवसांनंतर सापडला शेतकऱ्यांच्या आंदोलनात

येथे हा तरुण मोफत दिलेलं अन्न खात होता, घरात मात्र सर्वजण चिंतेत होते

येथे हा तरुण मोफत दिलेलं अन्न खात होता, घरात मात्र सर्वजण चिंतेत होते

  • Share this:
    नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर : सावकाराकडून वाचण्यासाठी आपला वेश बदलून दिल्लीतील सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात (Farm protest) लपून बसल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी पोलिसांनी या व्यावसायिकाला ताब्यात घेतलं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुरादनगर शहरात राहणारा प्रवीण याने 1 डिसेंबर रोजी आपलं घर सोडलं आणि परतले नाही. तो गाजीपूर-गाजियाबाद सीमेवर सापडला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, यापूर्वीही तो गायब झाला होता.  मात्र काही दिवसांनी परतला होता. यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी 12 डिसेंबरपर्यंत पोलिसांकडे तक्रार दाखल केली नव्हती. मात्र बऱ्याच दिवसांनंतरही प्रवीण घरी आला नसल्याने कुटुंबीय चिंतेत होतं. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ज्यांनी त्याला पैसे दिले होते, त्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी तो शेतकऱ्यांच्या आंदोलनात गेला. येथे त्याला मोफत जेवण मिळत होतं. तर दुसरीकडे दिल्लीतील टिकरी बॉर्डरवर (हरियाणा-दिल्ली बॉर्डर) विरोध करणाऱ्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की, ते सरकारसोबत चर्चा करण्यासाठी तयार आहे. मात्र आंदोलन करीत राहणार. हरियाणा-दिल्ली बॉर्डरवर विरोध करणाऱ्या एका शेतकऱ्याने सांगितलं की, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. केंद्र सरकार आता सर्वोच्च न्यायालयाची मदत घेत आहे. जेणे करुन त्यांचा अहंकार दुखावला जाऊ नये. सोबत ते म्हणाले की, सरकारसोबत झालेली चर्चा लाइव्ह टेलिकास्ट केली जावी. सर्वोच्च न्यायालयात शेतकरी आंदोलनाची सुनावणी आता टळली आहे. कोर्टात शेतकऱी संघटना नसल्यामुळे समितीची निर्णय घेण्यात आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, ते शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आपला निर्णय देईल. या प्रकरणाची सुनावणी दुसरी बेंच करणार आहे. सर्वोच्च न्यायालयात हिवाळ्याची सुट्टी आहे, अशात वेकेशन बेंच याची सुनावणी करेल.
    Published by:Meenal Gangurde
    First published: