भीक मागणारा 'तो' तरुण निघाला कोट्यधीश, भिकारी होण्याचं कारण ऐकाल तर धक्का बसेल

भीक मागणारा 'तो' तरुण निघाला कोट्यधीश, भिकारी होण्याचं कारण ऐकाल तर धक्का बसेल

दोन वर्षांपासून रस्त्यावर भीक मागणारा एक तरुण कोट्यधीश निघाल्याचं समोर आलं आहे. जखमी अवस्थेतील तरुणाला उपचारासाठी दाखल केल्यानंतर झाला खुलासा. दारुच्या सवयीनं त्याला भिकारी केलं होतं.

  • Share this:

अंबाला,13 जानेवारी: हरियाणा राज्यातील अंबाल्यातील रस्त्यांवर एक तरुण गेल्या दोन वर्षांपासून भीक मागत होता. मात्र भीक मागणारा हा तरुण कोट्यधीश असल्याचं वास्तव समोर आलंय. कोट्यधीश असलेल्या तरुणाचं नाव धनंजय आहे. मात्र तो धर्मेंद या नावानं भीक मागत असल्याचं समोर आलंय. मानसिक स्थिती खराब झाल्यानंतर तो घर सोडून निघून गेला होता. घर सोडून आल्यानंतर तो अंबाला इथं पोहचला. मात्र त्याच्या वाईट सवयीमुळं त्याच्यावर भीक मागण्याची वेळ आलीय. दारू पिण्याची वाईट सवय असल्यामुळं त्याला भीक मागावी लागली. दोन वर्षांपासून तो भीक मागून जिवन जगत होता.  दारुची सवय आणि पैसे नसल्यामुळं त्याची अवस्था अतिशय वाईट झाली होती. अंबालातील गीता गोपाल संस्थेच्या एका तरुणाला धर्मेंद्र जखमी अवस्थेत मिळाला. संस्थेनं धर्मेंद्रची चौकशी केली असता त्याचं नाव धनंजय असल्याच उघड झालं येवढचं नाही तर तो कोट्यधीश असल्याचंही समोर आलं आहे.

कसा सापडला धनंजय ?

वाईट सवयीमुळं धनंजय घरातून पळून गेला  होता. पळून आलेला धनंजय धर्मेंद्र या नावानं गेल्या दोन वर्षांपासून अंबाला इथं राहात होता.  दारू पिण्याच्या सवयीमुळं त्याच्यावर भीक मागून  उदरनिर्वाह करण्याची वेळ आली.  मात्र गीत गोपाल संस्थेला धर्मेंद्रची माहिती मिळाली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनं धर्मेंद्र याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.  संस्थेचे कार्यकर्ते साहिल यानं  धर्मेंद्र याला त्याच्या कुटुंबीयाविषयी विचारलं. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याला आपला भाऊ  शिशूपाल याचा नंबर आठवला त्यानंतर धनंजय याची संपूर्ण कहाणी समोर आली.

धनंजयचा धर्मेंद्र कसा झाला?

धनंजय हा चांगल्या घरातील तरुण आहे. त्याचं शिक्षण पदवीपर्यंत झालं आहे. त्याचे वडील कोलकातामधील एका मोठ्या कंपनीत एचआर आहे. तसेच धनंजयला दोन बहिणी आहेत. धनंजय एका कंपनीत नोकरी सुद्धा करत होता. मात्र त्याच्या वाईट सवयीमुळं त्याला घर सोडूनं जावं लागलं. येवढचं नाही तर त्याला आपली ओळख लपवून नावही बदलावं लागलं. दारू पिण्याच्या सवयीमुळं त्याला भीक मागून दिवस काढावे लागले.

JNU हल्ला : चेहरा झाकून आलेल्या 'त्या' मुलीची अखेर क्राईम ब्रांचला ओळख पटली

बहिणीनं धनंजयला घरी नेलं

धनंजय हा दोन वर्षांपासून अंबाला इथं भीक मागून जीवन जगत होता. दोन वर्षापासून त्याचा घरच्यांशी संपर्क नव्हता. मात्र घर सोडून निघून गेलेला धनंजय अंबालात भीक मागून जीवन जगत असल्याची माहिती त्याच्या लहान बहिणीला मिळाली तेव्हा तिला धक्काच बसला. उत्तर प्रदेशातील आजमगढ इथं त्याचं कुटुंबीय राहातं. त्यामुळं त्याची लहान बहिण त्याला घेण्यासाठी आजमगढ इथून अंबाला इथं गेली. तिनं धनंजय याला घरी आणलं. तसेच धनंजय याला शोधून दिल्याबद्दल बहिणीनं संस्थेचे आभार मानले.  धनंजय याचं आयुष्य एक वेळ दारूच्या सवयीनं खराब केलं. आता त्याला दुसरं आयुष्य मिळालं आता तरी धनंजय यानं वाईट सवयीच्या मागे लागू नये अशीच अपेक्षा त्याच्या कुटुंबींनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2020 02:44 PM IST

ताज्या बातम्या