नवी दिल्ली, 2 जून : जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विविध देशांमध्ये कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरीकडे नागरिकांनी व्यवस्थित उपचार मिळावेत यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत.
सध्या भारतात ट्रेनमध्ये कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे. जगातील पहिले कोविड हॉस्पिटल या ट्रेनमध्ये तयार होईल. याबाबतची तयारी सुरू करण्यात आली असून सायंकाळपर्यंत कार्यालय रिक्त करण्याच्या सूचना रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ही ट्रेन दिल्लीच्या शकूर बस्ती वॉशिंग यार्डमध्ये उभी आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी या ट्रेनची पाहणी केल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे.
दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाची टीम बुधवारपासून या ट्रेनमध्ये तैनात असेल. व्हेंटिलेटर आणि इतर उपकरणे उपचारासाठी आणली जाणार आहे. गुरुवारी कोविड हॉस्पिटल ट्रेनमध्ये पूर्ण तयार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
व्हेटिंलेशन आणि कमीत कमी उष्णता लागावी यासाठी खास ठिकाण
ही ट्रेन पूर्णपणे आयसोलेटेड ठिकाणी ठेवण्यात आली आहे. ट्रेन एका खास शेडमध्ये पार्क केली गेली आहे. ट्रेनमध्ये वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांसाठी 3 एसी कोच तयार करण्यात आले आहेत. 10 स्लीपर बॉक्स मिळून रुग्णांसाठी आयसोलेशन कोच बनविण्यात आला आहे.
1 कोचमध्ये 16 रूग्ण
विशेष बाब म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत16 रुग्णांना 1 डब्यात ठेवण्यात येणार आहे. लवकरच कोविड हॉस्पिटल म्हणून तयार करण्यात आलेल्या १० डब्यांची आणखी एक कोविड ट्रेन चालविली जाणार आहे. रेल्वे आयसोलेशन डब्यांच्या छतांवर खास रंग लावण्यात येणार आहे. यामुळे डब्यातील तापमान नियंत्रणात राहिल. आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार सुमारे 5200 कोविड 19 आयसोलेशन डबे तयार करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूच्या संसर्गाला तोंड देण्यासाठी रेल्वेने बरीच व्यवस्था केली आहे. ट्रेनमध्ये विशेष आयसोलेशन डबे तयार करण्यात आले होते आणि त्यामध्ये सर्व वैद्यकीय संसाधने जमा केली गेली. परंतु आता पीडितांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने वातानुकूलित वेगळ्या कोचचे तापमान कमी करण्यासाठी त्यांच्या छतावर इन्सुलेटेड पेंट लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोचच्या आतचे तापमान 5 ते 6 डिग्री सेल्सियस कमी होईल, अशी अपेक्षा आहे. खरं तर, एनआयटीआय आयोगाने असं म्हटलं होतं की उन्हाळ्याच्या दिवसात देशातील बर्याच भागात तापमान 40 डिग्रीहून अधिक जाईल.
हे वाचा-मनोज तिवारी यांची दिल्ली BJP अध्यक्षपदावरुन हकालपट्टी, यांची केली नियुक्ती