Home /News /national /

आत्महत्येनंतर महिलेचा ऑडिओ झाला व्हायरल; म्हणाली, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे...

आत्महत्येनंतर महिलेचा ऑडिओ झाला व्हायरल; म्हणाली, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे...

यानंतर तातडीने त्यांनी आजूबाजूंच्या लोकांसह पोलिसांना माहिती दिली. घरातील पती-पत्नीच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तातडीने त्यांचे मृतदेह रुग्णालयात हलविण्यात आले. जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यानंतर तातडीने त्यांनी आजूबाजूंच्या लोकांसह पोलिसांना माहिती दिली. घरातील पती-पत्नीच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तातडीने त्यांचे मृतदेह रुग्णालयात हलविण्यात आले. जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

महिलेचा ऑडिओ समोर आल्यानंतर तिच्या कुटुंबातील कोणाही व्यक्ती रुग्णालयातून महिलेचा मृतदेह आणायला गेलं नाही.

    कुशीनगर, 7 मे : उत्तर प्रदेशमधील तरया सुजार ठाणे हद्दीत माधोपूर गावात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत महिला पोखरा टोलामध्ये राहत होती. ममता असं या महिलेचं नाव आहे. ममता हिने आत्महत्या केल्यानंतर तिचा एका ऑडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये महिलेने ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले आहे. हा ऑडिओ समोर आल्यानंतर भागात खळबळ माजली आहे. महिलेचा मृतदेह घेण्यासाठी तिच्या कुटुंबातील कोणीच पुढे आले नाही. शवविच्छेदन झाल्यानंतर ममताचा मृतदेह रुग्णालयात पडून आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की आतापर्यंत कोणताही व्यक्ती त्यांचा मृतदेह घेण्यासाठी आलेला नाही. पोखरामध्ये राहणारे राजकिशोर (ममताचे पती) सूरतमध्ये मजुरी करीत होते. त्यांच्यासह त्यांची पत्नी (ममत) आणि मुलं सुरतमध्येच राहत होते. लॉकडाऊनमुळे जेव्हा त्यांना काम मिळणं बंद झालं तेव्हा ते तरया सुजान या आपल्या गावी परतले. मंगळवारी घरी पोहोचल्यानंतर त्यांची स्क्रिनिंग करण्यात आली व त्यांना 21 दिवसांसाठी क्वारंटाइन राहण्याची सूचना दिली. मिळालेल्या माहितीनुसार ममता गेल्या अनेक दिवसांपासून ताप व सर्दीने आजारी होती. बुधवारी घरी एकांतात असताना ममताने गळ्यात फास अडकवून आत्महत्या केली. ममताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून एकूण संख्या 52000 च्या पुढे गेली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित -मुंबईतील मोठी बातमी; या दुकानांना लॉकडाऊनमधून मिळणार सूट धक्कादायक! आंध्रप्रदेशनंतर छत्तीसगडमध्येही वायू गळती, 7 मजूर रुग्णालयात दाखल
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sucide

    पुढील बातम्या