पत्नी 10 मार्चची आतुरतेने वाट पाहत होती, मात्र 10 दिवसांपूर्वीच तिरंग्यात लपेटून आला पती

पत्नी 10 मार्चची आतुरतेने वाट पाहत होती, मात्र 10 दिवसांपूर्वीच तिरंग्यात लपेटून आला पती

मन हेलावणारी घटना.. जवान जाताना पत्नीला म्हणाले होते, शिवाय दोन दिवसांपूर्वी त्यांचा फोनही झाला होता

  • Share this:

लुधियाना, 1 मार्च : लेहमध्ये (Leh) तैनात असताना शहीद झालेले सुभेदार परविंदर सिंघ (Subhedar Parvindar Singh) यांच्यावर रविवारी रात्री लष्करी सन्मानासह अंत्यंसंस्कार करण्यात आला. त्यांच्या 13 वर्षांच्या मुलाने चितेला मुखाग्नी दिला. पती शहीद झाल्याची बातमी कळताच पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परविंदर जेव्हा शेवटच्या वेळी घरातून बाहेर पडत होते, तेव्हाचं ते शब्द आजही सर्वांच्या लक्षात आहेत. ते जाताना म्हणाले होते की, मी 10 तारखेला येईन. तेव्हा आपण रात्रीचं जेवण एकत्र करू. मात्र परविंदर घरी आले मात्र तिरंग्यात लपेटून.

मिळालेल्या माहितीनुसार 42 वर्षीय परविंदर सिंघ 22 पंजाब रेजिमेंटच्या लेहच्या बटालिक सेक्टरमध्ये सुभेदार पदावर तैनात होते. 25 फेब्रुवारी रोजी ड्यूटीवर असताना डोंगरावरुन पाय घसरल्याने ते घाटात कोसळले. रविवारी रात्री साधारण 8 वाजता त्यांचं पार्थिव घरी आणण्यात आलं, त्यानंतर घरात एकच गोंधळ उडाला. घरापासून ते स्मशानापर्यंत लोकांनी फुलांचा वर्षाव केला आणि शहीद परविंदर सिंघ अमर रहेच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. यादरम्यान परविंदर सिंघ यांचे वडील अमर सिंघ म्हणाले की, त्यांना आपला मुलगा शहीद झाला याचा अभिमान आहे. देशासाठी शहीद होण्याची संधी प्रत्येकालाच मिळत नाही. पत्नी कुलविंदर सिंघ म्हणाल्या की, दोन दिवसांपूर्वी पतीसोबत फोनवर बोलली होती. ते 10 मार्च रोजी सुट्टीवर घरी येणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र होत्याचं नव्हतं झालं. परविंदर सिंघ यांच्यामागे त्यांचं अख्खं कुटुंब आहे. कुटुंबाबरोबर स्थानिकांनाही परविंदर यांचा अभिमान आहे.

हे ही वाचा-पंतप्रधान मोदींनंतर या 2 मुख्यमंत्र्यांनीही घेतली कोरोना लस

राजकीय व्यक्तींही झाले सहभागी

शहीद सैनिकाला श्रद्धांजली देण्यासाठी प्रशासनाकडून SDM नरिंदर सिंघ धालीवाल, आमदार सर्वजीत कौर माणूके, माजी मंत्री मलकीत सिंघ दाखा, माजी आमदार एसआर कलेर, प्रो. सुखविंदर सिंघ आदी लोक सहभागी झाले होते.

देशातील नागरिकांना सुरक्षित जगता यावं, यासाठी भारतीय सैन्य सीमेवर स्वत:चा जीव धोक्यात घालून लढा देत आहे. अगदी कुटुंबाला मागे ठेऊन भूक-तहान विसरुन भारतीय सैन्य करीत असलेल्या कामगिरीला तोड नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: March 1, 2021, 3:57 PM IST

ताज्या बातम्या