पत्नी रोज करायची भांडण, पतीने हत्या करुन मृतदेह फेकला नाल्यात

पत्नी रोज करायची भांडण, पतीने हत्या करुन मृतदेह फेकला नाल्यात

रोज रोजच्या भांडणाला वैतागल्याने त्याने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मे : ज्या पत्नीसह आयुष्यभर सुख-दु:ख वाटण्याचं वचन घेतलं होतं, त्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दिल्लीतील आनंद पर्वत परिसरातील आहे.

पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या तपासात बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या. रोज रोज भांडणाला वैतागून आरोपीने हे कृत्य केलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुधीर कुमार एका खासगी कंपनीत सेल्समॅनचे काम करतो. गेल्या 23 मे रोजी रात्री सुधीरने आपली पत्नी हरवल्याची तक्रार आनंद पर्वत ठाण्यात दाखल केली. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी शेजाऱ्यांसह सातत्याने पत्नीचा शोध घेतल असल्याचं नाटक करीत होता. यादरम्यान पोलिसांनी सुधीरच्या वागण्याची शंका आली.

टेक्निकल सर्विलान्समध्ये आरोपीचं सत्य समोर आलं. त्यावेळी आरोपीने गुन्ह्याचा स्वीकार केला. चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की त्याची पत्नी दररोज त्याच्यासोबत विविध कारणांनी भांडण करत असे. रोज-रोजच्या भांडणांनी तो वैतागला होता. त्यामुळे त्याने पत्नीची हत्या करण्याचं ठरवलं. आणि तिची गळा दाबून हत्या केली. पत्नीचा शव त्याने नाल्यात फेकून दिला. आणि घरी आल्यानंतर तो पत्नीला शोधण्याचं नाटक करू लागला.

हे वाचा -रेल्वे प्रवासात एकाच दिवसात 7 मजुरांचा मृत्यू; कारण ऐकून बसेल धक्का

उंदरांपासून सावध राहा! कोरोना लॉकडाऊनमध्ये झालेत आक्रमक; माणसांवर करताहेत हल्ला

First published: May 27, 2020, 11:39 AM IST

ताज्या बातम्या