Home /News /national /

शहीद जवानाच्या पत्नीने अशी केली कोरोना योद्ध्यांची मदत, मुख्यमंत्री झाले भावुक; म्हणाले, निशब्द झालोय...

शहीद जवानाच्या पत्नीने अशी केली कोरोना योद्ध्यांची मदत, मुख्यमंत्री झाले भावुक; म्हणाले, निशब्द झालोय...

महिनाभरापूर्वी बस्तरमध्ये जवान उपेंद्र साहू नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले. अशा शूर योद्धाच्या पत्नीने एक आदर्शवत उदाहरण ठेवले आहे.

    रायपूर, 29 एप्रिल : संपूर्ण देशाबरोबरच छत्तीसगड (Chhattisgarh) मध्ये कोरोनाव्हायरस (Coronavirus) विरूद्ध युद्ध सुरू आहे. आता या युद्धामध्ये कोरोना योद्धांना साथ द्यायला एका शहीद जवानाची पत्नी पुढे आली आहे. कोरोनासारख्या संकटाच्या वेळी त्यांनी मोठा पाठिंबा दर्शविला आहे. कोरोना विषाणूचा परिणाम पाहता शहीद उपेंद्र साहू यांची पत्नी राधिका साहू यांनी बस्तरचे पोलीस अधीक्षक दीपक झा यांच्याकडे मुख्यमंत्री मदत निधीत 10 हजारांची मदत दिली. अशा परिस्थिततही राधिया यांनी मदत दिली याबद्दल मुख्यमंत्री भावुक झाले. जर आज माझे पती असते तर त्यांनाही हेच केलं असतं, असंही राधिका यावेळी म्हणाल्या. शहीद जवान उपेंद्र साहू हा जगदलपूर येथील पाथ्रागुडा बस्तर जिल्ह्यातील रहिवासी होते. महिनाभरापूर्वी बस्तरमध्ये जवान उपेंद्र साहू नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले. अशा शूर योद्धाच्या पत्नीनेही एक आदर्शवत उदाहरण ठेवले आहे. शहिदच्या पत्नीच्या या चांगल्या उपक्रमाचे खुद्द छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही कौतुक केले आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विटरद्वारे लिहिले आहे की, 'शहिदची पत्नी राधिका साहू यांनी बस्तरच्या पोलीस अधीक्षक दीपक झा यांच्याकडे कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी मुख्यमंत्री मदतनिधीला दहा हजार रुपये दिले आहेत. यावर मी निशब्द आहे. त्यांना माझा सलाम.' दोन महिन्यांपूर्वी बस्तर जिल्ह्यातील मर्दम पोलीस स्टेशन भागात पोलीस कर्मचार्‍यांच्या माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन सीएएफचे 2 जवान शहीद झाले. तर सीआरपीएफचा एक जवान गंभीर जखमी झाला होता. शहीद सैनिकांपैकी उपेंद्र साहू हे जगदलपूरमधील पाथ्रागुडा येथील रहिवासी होते. महिन्याभरापूर्वी सीआरपीएफ आणि सीएएफची संयुक्त टीम बरसूर ते नारायणपूरपर्यंत सुरू असलेल्या रस्ते बांधकाम कामात सुरक्षेसाठी रवाना झाली होती. दरम्यान, मालेवाही आणि बोदली दरम्यान माओवाद्यांनी लावलेल्या आयईडी स्फोटांमुळे पोलीस कर्मचारी उपेंद्र साहू शहीद झाले. आता शहीद जवानाच्या पत्नीने कोरोनाच्या योद्ध्यांसाठी मुख्यमंत्री मदतनिधीला जी रक्कम दिली आहे ते संजीवनीपेक्षा कमी नाही. संबंधित -अमेयने मराठीत वाचलं इरफानचं ‘ते’ पत्र, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या