इंदूर 03 फेब्रुवारी : असं म्हणतात की, उतरत्या वयात वृद्ध दाम्पत्यांना एकमेकांचाच आधार असतो. म्हणून दोघेही एकमेकांची खूप काळजी घेत असतात. आपल्या आजी-आजोबांमधलं हे प्रेम पाहून कुटुंबीयांमध्ये सर्वांनाच आनंद मिळतो. पण, या प्रेमामुळे नीमा कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण, नीमा कुटुंब आपल्या वयोवृद्ध वडिलांच्या निधनामुळे सावरत नाही तोपर्यंत त्यांच्या आईचंही निधन झालं आहे. आपल्या पतीच्या निधनाने दु:खात असलेल्या त्यांच्या पत्नीनही तेराव्याच्या कार्यादिवशीच अखेरचा श्वास घेतला. या घटनेनं संपूर्ण नीमा कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नीमा कुटुंबीयांनी अखेर आपल्या आई-वडिलांच्या श्राद्ध कार्य एकाच दिवशी केला.
इंदूरमध्ये नेमा समाजमधील 80 वर्षीय कोमलदास नीमा यांचं दीर्घ आजाराने 11 जानेवारी रोजी निधन झाले. निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. 22 जानेवारी रोजी त्यांचं श्राद्ध कार्य ठेवण्यात आलं होतं. कोमलदास यांच्या पत्नी त्यांच्या निधनाने सर्वाधिक दु:खी होत्या. अखेर त्यांची प्रकृती श्राद्ध कार्याच्या दिवशी खालावली आणि त्यांनीही त्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला. आता कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. एकीकडे वडिलांचं निधन तर आता त्यांच्या श्राद्ध कार्यादिवशी आईनेही श्वास सोडला होता. आई-वडिलांचं एकमेकांवरचं अतोनात प्रेम पाहता नीमा कुटुंबीयांनी दोघांचं श्राद्ध एकाच दिवशी करायचं ठरवले. आणि ठरल्याप्रमाणे नेमा धर्मशाळामध्ये कोमलदास नीमा आणि त्यांची पत्नी निर्मलाबाई नीमा यांचं श्राद्ध कार्य एकाच दिवशी संपन्न झाला. नीमा कुटुंबामधून वडिलधाऱ्यांचं असं जाणं, हे सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारं आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
'दादा-वहिनींचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांच्यामागे एक मुलगी आहे. तिचंही लग्न झालं आहे. वहिनींच्या निधनानंतर त्यांचं नेत्रदान करणार आहे', अशी माहिती कोमलदास यांचे लहान बंधू विनोद नीमा यांनी दिली.
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.