गावकऱ्यांकडून महिलेचा अमानुष छळ, जादूटोणा व काळी जादू करीत असल्याची होती शंका

गावकऱ्यांकडून महिलेचा अमानुष छळ, जादूटोणा व काळी जादू करीत असल्याची होती शंका

येथे भोंदू बाबा लहानग्यांना औषधांच्या नावावर शरीरावर चटके देतात

  • Share this:

चूरू, 9 फेब्रुवारी : राजस्थानमध्ये जादूटोणा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. अशीच एक लाजीरवाणी व दु:खद घटना चूरू जिल्ह्यातील सादुलपूर तहसील गाव लंबोर छोटी येथे समोर आली आहे. येथे एका 40 वर्षांच्या महिलेवर जादूटोणा करण्याचा आरोप लावत त्यांच्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करीत गंभीर स्वरुपात जखमी करण्यात आले आहे.

महिलेच्या दीरानेच केला हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, प्राणघातक हल्ला केल्याचा आरोपी हा दुसरा कोणी नसून महिलेचा दीर रघुवीर आहे. ते गेल्या दोन महिन्यांपासून महिलेविरोधात जादूटोणा करण्याचा आरोप लावीत होता. शनिवारी जेव्हा पीडिता इंद्रो देवी कचरा टाकायला घराबाहेर निघाली तेव्हा आरोपीने महिलाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. आरोपीने महिलेच्या डोक्यावर इतके वार केले की त्यात ती बेशुद्ध पडली. त्यानंतर कुटुंबीयांनी इंद्रो देवींनी सादुलपूर येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर मात्र त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जादूटोणा, अंधविश्वास आणि चेटकीणीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.

मेवाडमध्ये या स्वरुपातील अनेक प्रकरणे आली समोर

मेवाळ भागात जादूटोणाच्या आरोपामुळे मारहाणीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. तेथे तर मुलं आजारी असेल तर त्याला रुग्णालयात घेऊन जात नाही तर भोंदू बाबांकडे घेऊन जातात. तेथे भोंदू बाबा लहानग्यांना औषधांच्या नावावर शरीरावर चटके देतात. तर काही महिलांना चेटकीण म्हणून त्यांना मारहाणही केली जाते.

अन्य बातम्या

Facebookवरील प्रेमानंतर विवाहित मुलाशी ठेवले संबंध, तरुणीने थेट खेचलं कोर्टात

खवले मांजरांची तस्करी करणारी टोळी अटकेत, किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का

First published: February 9, 2020, 3:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading