मजुरांच्या स्थलांतरामुळे भारतासमोर उभं राहणार हे संकेट, UNने दिला इशारा

मजुरांच्या स्थलांतरामुळे भारतासमोर उभं राहणार हे संकेट, UNने दिला इशारा

कोरोनामुळे सर्व जगावरच संकट ओढवलं आहे. यात जगातले जवळपास सगळेच देश भरडून निघत आहेत. प्रत्येक देशांचे प्रश्न हे वेगळे आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 25 मे : कोरोनामुळे सर्व जगावरच संकट ओढवलं आहे.  यात जगातले जवळपास सगळेच देश भरडून निघत आहेत. प्रत्येक देशांचे प्रश्न हे वेगळे आहेत. कोरोनामुळे जे देशांतर्गत विस्थापन झालं त्यामुळे भारतासमोर नवीनच संकट निर्माण होणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात देण्यात आला आहे. विस्थापनामागे अनेक कारणं असली तरी यावेळचं कारण हे खूपच वेगळं आहे. अतिशय संवेदनशीलतेनं हा प्रश्न हाताळावा लागेल. तरच कोट्यवधी लोकांचे संसार पुन्हा उभे राहतील नाहीतर देशासमोर एक वेगळीच समस्या निर्माण होईल असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील भीषण चक्रीवादळ 'अम्फान' मुळे मोठ्या संख्येने लोक विस्थापित झाल्याचा घटना पुढे असताना गेल्या वर्ष २०१९ मध्ये देशातील नैसर्गिक आपत्ती, संघर्ष आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे जवळपास ५० लाख लोकांचे विस्थापन झाल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्राने जारी केला आहे. दरवर्षी लाखो लोक विविध कारणामुळे विस्थापित होत असतात. विस्थापनामागे अनेक कारण असतात पण त्यामध्ये नैसर्गिक आणि संघर्ष हे दोन महत्वाची कारणे आहेत.

भारतात कोरोनाव्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन; विषाणूतज्ज्ञांचा धक्कादायक दावा

पण भारतात ज्या पद्धतीने कोरोना नंतर स्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये हि आकडेवारी अजून वाढण्याची शक्यता आहे. आगामी वर्षात येणार अहवाल हा अधिक धक्कादायक असण्याची शक्यता आहे. संयुक्त बाल-बाल निधी (युनिसेफ) च्या 'लॉस्ट ऐट होम' या अहवालात गेल्या वर्षी जगभरात सुमारे ३३०  लाख विस्थापनचे  नवीन प्रकरणे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे २५० लाख विस्थापित नैसर्गिक आपत्ती आणि ८०.५  लाख प्रकरणे संघर्ष आणि हिंसाचाराच्या घटनांशी संबंधित आहेत.

मजुरांच्या भेटीनंतर राहुल गांधी पुन्हा दौऱ्यावर; यंदा कोणाशी केली बातचीत?

अहवालानुसार २०२९ मध्ये भारतात नोंदविलेल्या ५० लाख ३७ हजार अंतर्गत विस्थापन आकडेवारींपैकी ५० लाख १८ हजार प्रकरणे नैसर्गिक आपत्तींशी आणि १९ हजार  प्रकरणे संघर्ष आणि हिंसाचाराच्या घटनांशी संबंधित आहेत. युनिसेफच्या अहवालानुसार भारत, फिलिपिन्स आणि चीन नैसर्गिक आपत्तीने फारच प्रभावित झाले आहेत. ज्यामुळे लाखो लोक विस्थापित झाले आहेत. या देशांमध्ये नैसर्गिक आपत्तींमधील विस्थापनाची टक्केवारी ही जगाच्या तुलनेत ६९  टक्के आहे.

First published: May 25, 2020, 10:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading