मानवतेला काळीमा फासणारा प्रकार; दारुच्या नशेत 9 महिन्यांच्या बाळाच्या बोटांची नखं काढली उपटून

मानवतेला काळीमा फासणारा प्रकार; दारुच्या नशेत 9 महिन्यांच्या बाळाच्या बोटांची नखं काढली उपटून

हा प्रकार अत्यंत लज्जास्पद आहे. त्या निरागस बाळाला पाहून कोणी असा क्रुरपणा कसं करू शकतं?

  • Share this:

गया, 7 मे : एकीकडे कोरोना (Coronavirus) संकट घोंगावत असताना लोक आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र यामध्ये अनेक गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना मगध विद्यापीठ ठाणे हद्दीत समोर आली आहे.

शिवगंज गावातील एकाच कुटुंबातील तब्बल 6 सदस्यांना घरात घुसून मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका 9 महिन्यांच्या बाळाला अत्यंत क्रुरपणे वागणूक देण्यात आली. ते हल्लेखोर इतके क्रुर होते की त्यांनी त्या 9 महिन्यांच्या बाळाच्या हाताच्या तीन बोटांची नखे उपटून काढली. यानंतर ते बाळ जोरजोरात रडू लागलं. त्या बाळाला जवळील रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. त्याशिवाय हल्ला केलेल्या या कुटुंबातील इतर सदस्यांवरही येथे उपचार सुरू आहेत.

या पीडित कुटुंबाच्या सदस्यांनी एका जमिनीची खरेदी केली होती. त्यावेळी त्याचे मोजमाप करण्यात आले होते. मात्र त्यानंतर काही बदमाश कुटुंबीयांकडून अधिक पैशांची मागणी करू लागले. पैसे देण्यास नकार दिल्याने त्या बदमाशांनी दारुच्या नशेत कुटुंबीयांना मारहाण केली. यावेळी कुटुंबीयांनी आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितले. या हल्लेखोराने बाळाला वीटेने मारल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय 9 महिन्यांच्या बाळाच्या हाताच्या तीन बोटांची नखे उपटून काढली, असं सांगत असताना पीडित कुटुंबीय ढसाढसा रडत होते.

संबंधित -जून, जुलै असणार सर्वात जास्त धोकादायक! एम्सच्या संचालकांनी केला मोठा खुलासा

VIDEO : एका मिनिटासाठी संपूर्ण शहर 'धुळी'स मिळालं, पाहा निसर्गाचं रौद्र रुप

First published: May 7, 2020, 5:29 PM IST

ताज्या बातम्या