इतिहास घडला, तिहेरी तलाक यापुढे गुन्हा; ऐतिहासिक विधेयकाला राज्यसभेची मंजुरी!

इतिहास घडला, तिहेरी तलाक यापुढे गुन्हा; ऐतिहासिक विधेयकाला राज्यसभेची मंजुरी!

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेने ऐतिहासिक अशा तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला मंजुरी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जुलै: लोकसभेपाठोपाठ राज्यसभेने ऐतिहासिक अशा तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला मंजुरी दिली आहे. राज्यसभेत हे विधेयक मंजूर होण्यासाठी 109 मतांची गरज होती. तिहेरी तलाक विधेयकावर आज दिवसभर चर्चा सुरु होती. राज्यसभेने हे विधेयक 99 विरुद्ध 84 मतांनी मंजूर केले. यात विरोध पक्षातील नेते आणि सत्ताधारी भाजपमधील नेते सहभाग झाले होते.

लोकसभा आणि राज्यसभेच्या मंजुरीनंतर आता यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होईल आणि हा कायदा अस्तित्वात येईल.

चर्चेदरम्यान जेडीयूच्या खासदारांनी सभात्याग केला होता. त्याआधी हे विधेयक सिलेक्ट समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव 100 विरुद्ध 84 मतांनी फेटाळण्यात आला. काँग्रेसने नेते आणि सभागृहातील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या विधेयकात आम्हाला आणखी काही सुधारणा करायच्या होत्या. त्यासाठी हे विधेयक सिलेक्ट समितीकडे पाठवणे गरजेचे होते. पण सरकार त्यासाठी तयार नाही. त्यामुळे विरोधी पक्ष या विधेयकाच्या विरोधात मदतान करत आहे. भाजप, शिवसेना यांच्यासह NDAतील सर्व पक्षांनी हे विधेयक मंजुर होण्यासाठी व्हिप जारी केला होता. सर्व खासदारांना सभागृहात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते आणि विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश दिले होते.

कोसळणारा पाऊस आणि पूर, अशा परिस्थितीत 6 महिन्याच्या तान्हुल्याला तरुणाने वाचवलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 06:44 PM IST

ताज्या बातम्या