Home /News /national /

कुत्र्याला फिरवण्यासाठी स्टेडियम लवकर बंद करणाऱ्या IAS दाम्पत्याची ट्रान्सफर; तब्बल 3500 KM केलं दूर

कुत्र्याला फिरवण्यासाठी स्टेडियम लवकर बंद करणाऱ्या IAS दाम्पत्याची ट्रान्सफर; तब्बल 3500 KM केलं दूर

IAS दाम्पत्याला तब्बल 3500 KM दूर करण्याचे आदेश देण्यात आले.

    नवी दिल्ली, 27 मे : दिल्लीतील (Delhi News) त्यागराज स्टेडियममध्ये कथितरित्या कुत्र्याला फिरवण्यासाठी सायंकाळी स्टेडियम लवकर  रिकामी करणारं आयएएस दाम्पत्य संजीव खिरवार आणि रिंकू दुग्गा यांचं ट्रान्सफर लद्दाख आणि अरुणाचल प्रदेश येथे करण्यात आलं आहे. दिल्लीत एकत्र राहणाऱ्या या आयएएस दाम्पत्याला आता 3500 किलोमीटर लांब राहावं लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी दिल्लीतील सर्व खेळ सुविधा रात्री 10 वाजेपर्यंत खुले ठेवण्याचे आदेश दिले होते. तर दुसरीकडे केंद्रानेही आयएएस दाम्पत्याविरोधात तातडीने कारवाई केली. केंद्र सरकारने गुरुवारी तातडीने कारवाई करीत आयएएस दाम्पत्य संजीव खेरवार आणि रिंकू दुग्गा यांची लद्दाख आणि अरुणाचल प्रदेश येथे बदली करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय मीडियामध्ये आलेल्या बातमीनंतर घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने एका आदेशात दिलं आहे की, एजीएमयूटी कॅडरचे 1994 बॅचचे आयएएस अधिकारी खिरवार यांना तत्काळ लद्दाख आणि त्यांच्या पत्नीला अरुणाचल प्रदेश येथे ट्रान्सफर करण्यात आलं. खिरवार आणि त्यांच्या पत्नीने त्याग राज स्टेडियममधील सुविधांचा गैरवापर केल्याच्या वृत्तानंतर गृह मंत्रालयाने दिल्लीच्या मुख्य सचिवांकडून माहिती मागवली होती. हा रिपोर्ट दाखल केल्यानंतर मंत्रालयाने त्यांच्या ट्रान्सफरचे आदेश दिले. खिरवार वर्तमान हे दिल्लीत प्रधान सचिव (राजस्व) च्या पदावर तैनात आहेत. मीडियामध्ये आलेल्या बातमीनुसार, त्याग राज स्टेडियमला सर्वसामान्य वेळेपेक्षा लवकर बंद केलं जातं. यामागील कारण म्हणजे आयएएस अधिकारी आपल्या कुत्र्याला फिरवू शकतील.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Arvind kejriwal, Delhi, Ias officer

    पुढील बातम्या