मुंबई, 17 सप्टेंबर : वाघ किंवा सापाच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सऱ्हास पाहायला मिळतात पण मगर पाण्याबाहेर येऊन शिकार करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मगर आणि कासव खरं तर दोन्ही उभयचर आणि कासवाची शिकार करणं तसं कठीण.
उन्हात बसलेल्या मगरीला कडकडून भूक लागली आणि समोर जात असलेलं कासव पाहून या मगरीची भूक आणखीन चवताळली. या मगरीनं कासवाला खाण्याचा प्रयत्न केला. कासव आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होतं. त्यानं आपलं सगळं अंग आपल्या कवचाच्या आत दुमडून घेतलं आणि मगर मात्र त्याची शिकार करण्यासाठी त्याला खाण्यासाठी धडपड करू लागलं.
Thick skin and a strong mind are essential if you want to survive in this world. Nobody can break you down if you don't let them. -Unknown pic.twitter.com/NePsZm5REq
या मगरीनं कासवाला खाण्याचा प्रयत्न केला मात्र सगळे प्रयत्न अपयशी ठरले. कासव मगरीच्या तोंडातून बाहेर आलं आणि आपला जीव वाचवून निघून गेलं. सोशल मीडियावर कासव आणि मगरीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 31 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 600 हून अधिक लोकांनी रिट्वीट केला तर 38 लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.
काही युझर्सनी वेगवेगळ्या टुथपेस्टची नाव देऊन मगरीचे दात कमजोर असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ 15 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आला होता. त्यावेळी 28 हजार लोकांनी पाहिला होता. 'तुम्हाला जगात टिकायचे असेल तर जाड त्वचा व कणखर मन असणे आवश्यक आहे. आपण त्यांना संधी दिली नाही तर कोणीही आपल्याला तोडू शकत नाही.' असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.