Home /News /national /

दहशतवाद्याला पळवून पळवून मारलं; जम्मूतील Sunjwan Encounter चा Shocking Live Video

दहशतवाद्याला पळवून पळवून मारलं; जम्मूतील Sunjwan Encounter चा Shocking Live Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांबा दौऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी ही चकमक घडली. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे.

    श्रीनगर, 22 एप्रिल : जम्मूमधील (Jammu News) सुंजवानमधील जलालाबाद भागात शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलाने दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. यादरम्यान एक जवान शहीद झाला आणि 10 जणं जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जम्मू मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन जाण्यात आलं होतं. दोघेही जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांबा दौऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी ही चकमक घडली. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दहशतवादी पळत असून त्याच्या मागून सुरक्षा दलाकडून फायरिंग सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी 24 एप्रिल रोजी सांबाच्या पल्ली पंचायतमध्ये होणाऱ्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर हल्ला करण्याच्या तयारीत होते. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साधारण साडे चार वाजता दहशतवाद्यांनी चट्टा कँम्पजवळ सीआयएसएफच्या बसवर अचानक ग्रेनेडने हल्ला केला. बसमध्ये 15 सीआयएसएफचे जवान होते. या हल्ल्यानंतर तातडीने दोन्ही दहशतवादी लपवले. यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चमकम झाली. 5 तासांनंतर दोन्ही दहशतवाद्यांना मारण्यात आलं. हे ही वाचा-बारामुल्लामध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, तीन परदेशी दहशतवाद्यांसह पाच ठार; चकमक अजून सुरुच डीजीपी दिलबाह सिंहने सांगितलं की, पोलीस आणि अर्धसैनिक दलाच्या संयुक्त टीमने दोन्ही दहशतवाद्यांना मारलं. यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा एक सहाय्यक उप निरीक्षक शहीद झाला. जम्मू-काश्मीर पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य सुरक्षा दलांचे जवान या चकमकीत जखमी झाले आहे. जम्मू झोनचे एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितलं की, या बाबत एक विशेष सूचना मिळाली होती की, दहशतवादी येथेच लपून बसले आहेत आणि काहीतरी करण्याची योजना करीत आहेत. याच्या आधारावर घेराव घालण्यात आला. यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. ज्या जबावाखाली दोन दहशतवाद्यांनी मारण्यात आलं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Shocking video viral, Terror attack

    पुढील बातम्या