अयोध्येत बनणार श्रीरामांचे भव्य स्मारक, मराठमोळे मूर्तीकार साकारणार जगातील सर्वात उंच मूर्ती

अयोध्येत बनणार श्रीरामांचे भव्य स्मारक, मराठमोळे मूर्तीकार साकारणार जगातील सर्वात उंच मूर्ती

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राची जगातील सर्वात उंच अशी भव्य मूर्ती साकारण्यात येणार असल्याची माहिती या मूर्तीचे मूर्तीकार अनिल राम सुतार यांनी दिली.

  • Share this:

सोलापूर, 09 मार्च: गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणारा राम मंदिर जन्मभूमीचा वाद संपुष्टात आल्यानंतर आता अयोध्येत राम मंदिर उभारलं जात आहे. यासाठी देशभरातून निधी देखील जमा करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते याकरता निधी गोळा करण्याचे काम करत आहेत. दरम्यान अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राची जगातील सर्वात उंच अशी भव्य मूर्ती साकारण्यात येणार असल्याची माहिती या मूर्तीचे मूर्तीकार अनिल राम सुतार यांनी दिली. ते आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी 'News18 लोकमत'शी बोलताना याबाबत माहिती दिली.

प्रभू श्रीरामांची ही मूर्ती जगातील सर्वात उंच 251 मीटर म्हणजेच 820 फूट इतकी भव्य असणार आहे. हि मूर्ती कांस्य धातूची असणार आहे. यामध्ये मुर्तीचा चबुतरा हा 51 मीटर उंचीचा तर त्यावर श्रीरामांची 200 मीटर उंचीची मुर्ती असणार आहे, अशी माहिती मूर्तीकार अनिल राम सुतार यांनी दिली.

नव्वदच्या दशकापासून भारतीय राजकारणातील महत्वाचा आणि कळीचा मुद्दा बनून राहिलेला विषय म्हणजे अयोध्येतील राम जन्मभूमीचा वाद. तब्बल तीन दशकं भारतीय राजकारण या मुद्द्याभोवती फिरत होतं. वास्तविक पाहता श्रीरामांनी 14 वर्षे वनवासात घालवल्याचे रामायणात सांगितले आहे. मात्र या मंदिराचे काम सुरू होण्यासाठी दोन वनवासांच्या कालावधीपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येतील मंदिराच्या पायाभरणीचा मुहूर्त साधला गेला.

(हे वाचा-300 किमी परीघातील शत्रूचा करेल खात्मा, सायलेंट किलर 'INS करंज'ची खास वैशिष्ट्ये)

कशी असेल श्रीरामांची भव्य मूर्ती?

- श्रीरामांची जगातील सर्वात मोठं मूर्तीरुपी स्मारक अयोध्येत

- ही भव्य मुर्ती साकारण्याचे काम अनिल राम सुतार आणि राम सुतार या मराठमोळ्या मूर्तीकारांकडे

- श्रीरामांची ही मूर्ती गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षा मोठी असणार आहे.

-अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर जवळपास 125 ते 130 एकर परिसरात ही मुर्ती साकारण्यात येणार आहे.

- या नदीकाठी सुंदर अशा घाटाची निर्मिती करण्यात येणार असून त्याठिकाणी लेझर शोदेखील असणार आहे.

- या मूर्तीची उंची 251 मीटर म्हणजेच 820 फूट इतकी उंच असणार आहे.

- यापैकी 50 मीटरचा चबुतरा असून त्याच्यावर 200 मीटरची मूर्ती असणार आहे.

- या 51 मीटर उंचीच्या चबुतऱ्यात जवळपास 14 ते 15 मजले असणार आहेत.

(हे वाचा-मुथूट फायनान्स उभं करणाऱ्या उद्योजकाचा अपघातात मृत्यू; पाय घसरल्याचं निमित्त)

- यामध्ये पर्यटकांना पुजेसाठी तसेच आध्यात्मिक अनुभुतीसाठी श्रीरामांचे मंदिर, लायब्ररी, थिएटर, म्युझिअम, ऑडिटोरियम, रामायणाची शिल्पाकृती अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असणार आहे.

- लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींसाठी एक उत्तम पर्यटन केंद्र म्हणून ही मूर्तीरुपी स्मारक साकारण्यात येणार आहे.

- प्रभू श्रीरामांचे जीवनचरित्र माहिती होण्यासाठी या स्मारकाचा उपयोग होणार आहे.

- या मूर्तीच्या निर्मितीसाठी 2000 ते 3000 कारागीर आणि कामगार काम करणार आहेत.

-यातील सर्व कारागीर हे भारतीय असणार आहेत आणि याचे पुर्ण काम भारतातच होणार आहे.

-श्रीरामांची ही मूर्ती राजवस्त्र परिधान केलेली असून श्रीरामाने डावा पाय एका दगडावर ठेवला आहे. तसेच उजव्या हातात बाण तर डाव्या हातात धनुष्य धरला आहे. शत्रूकडे भेदक नजर असणारी ही रुबाबदार मूर्ती असणार आहे.

-हा संपूर्ण प्रकल्प पुर्ण होण्यासाठी साधारण साडेतीन ते चार वर्षे लागणार आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: March 9, 2021, 11:47 AM IST

ताज्या बातम्या