‘काजल से बहुत प्यार था’, पत्नी-मुलांची केली हत्या आणि भिंतीवर लिहिली विश्वासघाताची कथा

‘काजल से बहुत प्यार था’, पत्नी-मुलांची केली हत्या आणि भिंतीवर लिहिली विश्वासघाताची कथा

पतीने भिंतीवर सुसाइड नोट लिहिली आहे. यामध्ये त्याने अनेक खुलासे केले आहेत

  • Share this:

गाजियाबाद, 28 फेब्रुवारी : विवाहबाह्य संबंधांमुळे पुन्हा एकदा भयावह शेवट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पत्नीचे अन्य तरुणासोबत विवाहबाह्य संबंध होते. यामुळे त्रस्त पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर तर त्याने क्रुरपणाचा कळसच गाठला. त्याने आपल्या दोन लहान निरागस मुलांची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:लाही संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने घराच्या भिंतीवर पत्नीच्या विश्वासघाताची कथा लिहिली. पोलिसांनी भिंतीवर लिहिलेल्या नोटच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे.

हे प्रकरण राजधानी दिल्लीपासून काही अंतरावरील गाजियाबाद येथील आहे. या घरातून पोलिसांनी पती, पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढण्य़ात आले आहे. सांगितले जात आहे की धीरज त्यागी नावाच्या व्यक्तीने आपली पत्नी काजलसोबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय धीरजला आला होता. याच गोष्टीवरुन गुरुवारी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. ज्यानंतर धीरजने आपल्या पत्नीची हत्या केली. यानंतर आपल्या दोन लहान मुलांचीही त्याने निघृणपणे हत्या केली. पती आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर घराच्या भिंतीवर त्याने सुसाइड नोट लिहिली आणि घराच्या छताला फाशी लावून आत्महत्या केली.

हेही वाचा - प्रेमाला नकार दिला म्हणून विद्यार्थ्याने केले वार, शिक्षिकेला पडले 150 टाके

भिंतीवर काय लिहिले होते...

धीरजने भिंतीवर लिहिले होते की, मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करत होता. ती मुलांसोबत फोनवर बोलायची. मी तिला अनेकदा समजावले. तिला दारु पिण्याची सवयदेखील लागली होती. यासाठी तिचे भाऊ जबाबदार आहेत. मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करीत होतो.

या प्रकरणाचे गांभीर्य पाहता, पोलीस या तपासासाठी न्यायवैद्यक विश्लेषकांची (forensic analyst) मदत घेत आहेत. प्राथमिकदृष्ट्या पोलिसांचे म्हणणे आहे की, भिंतीवर लिहिलेल्या सुसाइड नोटवरील हस्तलिखित धीरजचे आहे. सर्व मृतदेहांना ताब्यात घेऊन त्यांना शवविच्छेदनासाठी जवळील सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. पोलीस आता धीरजच्या कुटुंबीयांची प्रतीक्षा करीत आहे. त्यांच्या विधानाच्या आधारावर पोलीस या प्रकरणाचा तपास करतील.

First published: February 28, 2020, 3:46 PM IST

ताज्या बातम्या